नागपूर : सिव्हील २० इंडिया २०२३ गटामुळे (सी 20) जी २० गटाच्या कार्यकक्षा विस्तारली असून सामाजिक मुद्द्यांचा समावेश होण्यास मोलाची मदत झाली असल्याची भावना आज येथे झालेल्या कार्यकारी समितीच्या बैठकीत व्यक्त करण्यात आली. सिव्हील २० इंडिया २०२३ गटाच्या (सी २०) कार्यकारी समितीची बैठक सोमवारी नागपूर येथील रेडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये  झाली. या बैठकीला सिव्हील २० इंडिया २०२३ गटाच्या सुकाणू समितीचे  सदस्य, आंतरराष्ट्रीय सल्लागार समितीचे सदस्य आणि सिव्हिल २० इंडिया गटाचे कार्यकारी गट समन्वयक तसेच रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे आणि सिव्हिल २० इंडिया गटसचिवालयाचे आश्रयदाते या बैठकीला उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

 बैठकीला उपस्थित असलेल्या सुकाणू समितीच्या सदस्यांमध्ये भारतातल्या अमृता विद्यापीठमचे अध्यक्ष स्वामी अमृतस्वरूपानंद, सेवानिवृत्त भारतीय राजदूत आणि सिव्हिल  इंडिया  चे शेर्पा विजय के. नांबियार, निवेदिता भिडे, विवेकानंद केंद्राच्या अखिल भारतीय उपाध्यक्ष निवेदिता भिडे,  ब्राझीलमधील गेस्टॉस आणि सिव्हिल २० इंडिया  च्या ट्रोइका सदस्य अलेस्सांद्रो नीलो, मार्टिन रेचर्ट्स, लक्झेंबर्गच्या रायझिंग फ्लेम्सच्या सह-संस्थापक आणि संचालक आणि माजी युरोपियन कमिशनर ऑफ जस्टिस निधी गोयल, हे या बैठकीला उपस्थित होते.

हेही वाचा >>> नागपूरमध्ये सी-२० बैठकीला सुरूवात, देश विदेशातील प्रतिनिधींची उपस्थिती

वेळ, प्रयत्न आणि परमेश्वराची आराधना या बाबी आपल्या जगण्याचे सर्वात महत्वाचे अंग असल्याचे  सांगून स्वामी अमृतस्वरूपानंद म्हणाले, अध्यात्म हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. सरकारने तळागाळातील  सर्वसामान्य माणसांच्या समस्या ऐकून घेऊन त्यावर उपाय शोधून त्याची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या धोरणांच्या माध्यमातून याच तत्वाचे पालन करण्याचा प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.