-
देशात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या सभा सुरू असताना सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत.
-
देशामध्ये पाच टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणुका पार पडत असताना आता फक्त अखेरचा एक टप्पा शिल्लक आहे आणि या टप्प्यातील प्रचाराच्या सभा देशामध्ये होत आहेत.
-
या प्रचार सभांमधून एकमेकांवर टीका करताना इंडिया आघाडी आणि एनडीए आघाडी एकमेकांवर कुरघोडी करताना दिसत आहेत.
-
काँग्रेसचे हमिरपुर येथील उमेदवार सतपाल रायजादा यांच्या प्रचाराच्या सभेत राहुल गांधी बोलत असताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या प्रचार सभांमध्ये भ्रष्टाचार आणि पैशाचा वापर करून हिमाचल प्रदेशमधील सरकार पाडणार असल्याची उघडपणे घोषणा केली आहे, असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला. पंतप्रधानांनी त्यांच्या भाषणात असा दावा केला की, राज्यातील काँग्रेस सरकार टिकणार नाही, असे राहुल म्हणाले.
-
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंडी येथील भाजपाच्या उमेदवार कंगना राणावत यांच्या प्रचार सभेसाठी केलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाचा दाखला देत मोदींवर जोरदार टीका केली.
-
राहुल गांधी पुढे म्हणाले, नोटाबंदी आणि जीएसटीच्या अंमलबजावणीद्वारे अदानीसारख्या उद्याोजकांना मदत करून लहान व मध्यम व्यवसाय संपवून बेरोजगारी वाढवल्याचा आरोपही त्यांनी मोदी सरकारवर केला.
-
देशातील सैनिक भरती दोन प्रकारचे सैन्य देशाला नको आहे, असे सांगताना राहुल गांधी यांनी उमेदवार सतपाल रायजादा यांना पाठिंबा द्यावा असे आवाहन या सभेतून मतदारांना केले.
-
केंद्रात सरकार आल्यास अग्निपथ योजना रद्द करणे ही काँग्रेसची पहिली प्राथमिकता असेल, असे राहुल गांधी यांनी सांगितले. (सर्व फोटो लोकसत्ता संग्रहित) हे देखील पहा: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इंडिया आघाडीवर आरोप; म्हणाले “राज्यघटनेचे पुनर्लेखन…”…
Bihar Election Result 2025 Live Updates : तिकडे मतमोजणी चालू असताना मैथिली ठाकूर म्हणते, “मला वाटलं नव्हतं की इतक्या लवकर…”