-
बिहार विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रीय जनता दलाच्या फक्त २५ जागा निवडून आल्या. त्यामुळे लालू प्रसाद यादव आणि तेजस्वी यादव यांना मोठा धक्का बसला. (फोटो-संग्रहित छायाचित्र)
-
बिहारच्या निवडणुकीत RJD ला अपयश येताच लालू प्रसाद यादव यांची मुलगी व तेजस्वी यादव यांची बहीण रोहिणी आचार्य यांनी थेट कुटुंबीयांशी सर्व संबंध तोडल्याचे आणि राजकारण सोडण्याची घोषणा केली.(फोटो-संग्रहित छायाचित्र)
-
त्यामुळे विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबात सर्व काही आलबेल नसल्याचं दिसून आलं असून कुटुंबातील वाद चव्हाट्यावर आला आहे.(फोटो-संग्रहित छायाचित्र)
-
एक वेळ अशी होती की किडनी देऊन वडील लालू प्रसाद यादव यांना रोहिणी आचार्य यांनी वाचवलं. मात्र, आता असं काय झालं की रोहिणी आचार्य यांनी थेट कुटुंबीयांशी सर्व संबंध तोडण्याचा निर्णय घेतला, याबाबत चर्चा रंगल्या आहेत.(फोटो-संग्रहित छायाचित्र)
-
लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबातील वाद चव्हाट्यावर आल्याच्या पार्श्वभूमीवर रोहिणी आचार्य यांची सध्या मोठी चर्चा सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर रोहिणी आचार्य नेमकं कोण आहेत, त्यांच्याबाबत आपण थोडक्यात जाणून घेऊयात. (फोटो-संग्रहित छायाचित्र)
-
रोहिणी आचार्य कोण आहेत? : बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) नेते लालू प्रसाद यादव आणि राबडी देवी यांना ९ अपत्य आहेत. रोहिणी आचार्य या त्यांच्या दुसऱ्या कन्या आहेत. (फोटो-संग्रहित छायाचित्र)
-
रोहिणी आचार्य या सोशल मीडियावर आपली रोखठोक मते व्यक्त करत असतात. रोहिणी आचार्य यांनी सारण या यादव कुटुंबियांच्या पारंपरिक मतदारसंघातून लोकसभा निवडणूर लढवली होती. पण त्यांचा पराभव झाला.(फोटो-संग्रहित छायाचित्र)
-
रोहिणी आचार्य या व्यवसायाने डॉक्टर आहेत. त्यांचा लोकसभेच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांचं आणि कुटुंबातील अंतर वाढल्याचं बोललं जातं. तेव्हापासूनच त्या नाराज असल्याची चर्चा होती.(फोटो-संग्रहित छायाचित्र)
-
रोहिणी आचार्य यांनी एमबीबीएसचं शिक्षण पूर्ण केलेलं असून त्या डॉक्टर आहेत. २०२२ साली लालू प्रसाद यादव यांची प्रकृती खालावल्यानंतर रोहिणी आचार्य यांनी स्वतःची किडनी वडिलांना दिली होती..(फोटो-संग्रहित छायाचित्र)
-
दरम्यान, काही दिवसांपूर्वी लालू प्रसाद यादव यांनी त्यांचा मोठा मुलगा तेज प्रताप यादव यांची कुटुंबातून हकालपट्टी केली होती. त्यानंतर आता रोहिणी आचार्य यांनी स्वत:हून कुटुंबातून दूर जाण्याची घोषणा केली. त्यामुळे यादव कुटुंबातील वाद चव्हाट्यावर आला. (फोटो-संग्रहित छायाचित्र)