-
जॅकलिन आणि सूरज यांचा 'जीएफ बीएफ' हा म्युझिक व्हिडिओ १७ फेब्रुवारीला मुंबईतील एका मल्टिप्लेक्समध्ये लॉन्च करण्यात आला. ह्या व्हिडिओचे निर्माते भूषण कुमार असून रेमो डिसूझानी तो दिग्दर्शित केला आहे.
-
अल्बम लॉन्चवेळी जॅकलिन आणि सूरजचा मस्तीभरा अंदाज
-
जॅकलिन आणि सूरज यांची रोमॅण्टिक जोडी आपल्याला छायाचित्रतून पाहायला मिळते.
-
जॅकलिन आणि सूरज यांनी फोटोसाठी पोज दिली.
-
आपल्या नृत्याची झलक दाखवताना सूरज पांचोली.
-
सूरज आणि दिग्दर्शक रेमो डिसूझा यांनी नृत्य करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले.
-
कार्यक्रमादरम्यान पत्रकारांनी जॅकलिनला सूरज बरोबर चित्रपट करणार का असे विचारले असता ती म्हणाली, नक्कीच मी आशा करते. आम्ही एकत्र काम करताना खूप चांगला वेळ घालावला आहे. सूरज माझ्यासोबत जास्तीत जास्त रिअर्सल करत असे. आम्ही एकत्र रेमोच्या स्टुडिओवर जायचो. त्यामुळे चित्रीकरणावेळी आमची योग्य ती तयारी झालेली होती. तर सूरज म्हणाला की, जॅकलीनसोबत काम करताना खूप मजा आली. ती चित्रपटसृष्टीत माझ्यापेक्षा सिनियर आहे पण त्याची जाणीव तिने मला कधीच होऊ दिलेली नाही. पण, मला नक्कीच तिच्यासोबत लवकरात लवकर काम करायला आवडेल.
-
कॅमे-यास पोज देताना जॅकलिन फर्नांडिस.
-
यावेळी सूरजने काळ्या रंगाचे लेदर जॅकेट आणि निळी जीन्स परिधान केली होती.

Manoj Jarange : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबत उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय