-
महाराष्ट्रात सध्या 'सैराट' चित्रपटाची जोरदार हवा आहे. चित्रपटाला सर्वत्र तुफान प्रतिसाद मिळत आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळेंसोबतच चित्रपटातील परशा आणि आर्चीचे म्हणजेच आकाश ठोसर व रिंकू राजगुरूचेही कौतुक होत आहे. चित्रपटातील परशा आणि रिंकूचे काही संवाद सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.. त्यातील काही निवडक संवाद पुढीलप्रमाणे..
आर्ची मला तू लय आवडते.. मला पण तू आवडतो.. मराठीत सांगितलेलं कळत न्हाय..इंग्रजीत सांगू I LOVE YOU -
तू परशाला हात लावून तर बघ नाही तुझं थोबाड फोडलं तर नावाची आर्ची नाही..
-
नदीच्या काठी घर असायला पाहिजे..तिथं झुळूझुळू वाहणारं पाणी..पुढं अंगणात मोठी बाग.. मी कामाला जाईन, मी स्वयंपाक करीन, मी लाकडं तोडून आणीन..आणि मी दारात उभी राहून तुझी वाट बघेन
-
आर्ची घरची उठतील..
कसं काय आत्या बर हाय ना…इथून थेट मी शेतात जाणारए..बरं का.. इथून थेट शेतात जाणारए मी.. काय म्हणली रं ती.. बाहेर नीघ..म्हणली.. -
ऐ सल्या..तुझ्यासारखं गुटखा खाऊन मेल्यापेक्षा..आर्चीवर प्रेम करून मेलेलं बर..

सहाय्यक पोलीस महासंचालकांची आत्महत्या, IAS पत्नी जपान दौऱ्यावर असताना उचललं टोकाचं पाऊल