-
बॉलीवूड अभिनेता सलमान खान आणि त्याची कथित प्रेयसी लुलिया वेंतुर पुन्हा एकदा एकत्र दिसून आले. पंजाबमधले 'सुल्तान'चे चित्रीकरण आटपून सलमान आणि त्याची आई सलमा खान मुंबईत परतले. यावेळी लुलिया देखील उपस्थित होती. लुलिया सलमानच्या आईची यावेळी काळजी घेताना दिसून आली. नुकतेच काही दिवसांपूर्वी सलमान आणि लुलिया यांच्या लग्नाची चर्चा बॉलीवूड वर्तुळात पसरली होती. यंदाच्या वर्षात सलमान बोहल्यावर चढणार असल्याची जोरदार चर्चा आहे. (छाया- वरिन्दर चावला)
-
लुलिया सलमानची आई सलमा खान यांची काळजी घेताना दिसून आली. लुलियाने सलमानच्या आईला आधार देत कारपर्यंत सोडले. (छाया- वरिन्दर चावला)
-
याआधी सलमानच्या ५० व्या बर्थ डे पार्टीत देखील लुलिया उपस्थितांची अगदी सलमानच्या कुटुंबियांप्रमाणेच विचारपूस आणि काळजी घेताना दिसली होती.
-
सलमान विमानतळावरून बाहेर आल्यानंतर कारमध्ये आपल्या आईची वाट पाहत बसला होता. तर लुलिया सलमानच्या आईची काळजी घेत त्यांना कारपर्यंत घेऊन आली. (छाया- वरिन्दर चावला)
-
खान कुटुंबियांच्या प्रत्येक घरगुती कार्यक्रमांना लुलिया वेंतुर उपस्थित असल्याचे याआधी देखील पाहायला मिळाले होते. (छाया- वरिन्दर चावला)
-
सलमानची बहिण अल्विरा अग्निहोत्री देखील त्यांच्या समवेत होती. (छाया- वरिन्दर चावला)

IND vs ENG: नशीब फुटकं राव! विकेट मिळाली पण बुमराहच्या एका चुकीमुळे मेहनतीवर फेरलं पाणी; नेमकं काय घडलं?