-
मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस आणि बोल्ड अभिनेत्री अभिनेत्री सई ताम्हणकरचा आज वाढदिवस आहे. २५ जून १९८६ रोजी सांगलीतील एका कुटुंबात सईचा जन्म झाला. मराठीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये सई अग्रस्थानी आहे. (छाया सौजन्य: सई ताम्हणकर इन्स्टाग्राम)
-
मुळची सांगलीची असलेल्या सईचा मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रवास सोपा नव्हता. मालिकांमध्ये छोट्या भूमिका साकारण्यापासून सईने तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.
-
'या गोजिरवाण्या घरात' मालिकेने सईने टेलिव्हिजन क्षेत्रात पदार्पण केलं. 'अनुबंध', 'अग्निशिखा', 'तुझं माझं जमेना', 'साथी रे' या मालिकांमध्येही तिने काम केलं आहे.
-
'सनई चौघडे' या चित्रपटाने सईचे आयुष्य बदलले. या चित्रपटाने तिला मराठी चित्रपटसृष्टीत नाव मिळवून दिले.
-
मराठीतील बोल्ड अभिनेत्री म्हणून सई प्रसिद्ध आहे. 'नो एण्ट्री पुढे धोका आहे' चित्रपटातील बिकिनी सीनमुळे सई बरीच चर्चेत आली होती.
-
स्वप्निल जोशीसोबतची सईची जोडी चाहत्यांना फारच आवडली. या जोडीने एकत्र तीनच चित्रपट केले आहेत. पण, त्यांच्यातील केमस्ट्रिने चाहत्यांची मनं जिंकण्यात यश मिळवलं.
-
'हंटर'मध्ये मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत झळकण्यापूर्वी सईने आमिरच्या 'गजनी' या चित्रपटात छोटीशी भूमिका साकारली होती.
-
'दुनियादारी', 'सौ. शशी देवधर', 'बालक पालक', 'टाइम प्लीज', 'तू ही रे', 'वजनदार', 'वायझेड', 'क्लासमेट्स' यांसारख्या अनेक चित्रपटांतून सईने तिच्या अभिनयाचा ठसा उमटवला.
-
सई ताम्हणकरला टॅटूची फार आवड आहे. तिने तिच्या खांद्यावर रोमन लिपीत दोन तारखा गोंदल्या आहेत.
-
मराठी चित्रपटसृष्टीतील हरहुन्नरी अभिनेत्रीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

IPL 2025 Playoffs: क्वालिफायर-१ आणि एलिमिनेटरचे संघ ठरले! कधी, कुठे आणि किती वाजता खेळवले जाणार सामने? जाणून घ्या