-
बॉलिवूडच्या काही सेलिब्रिटींनी नववर्षासाठी देशाबाहेर फिरायला जायला प्राधान्य दिले तर आलिया भट्ट, सारा अली खान, बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोवर यांनी मात्र त्यांचे नवीन वर्ष मुंबईतच साजरे करण्याचा निर्णय घेतला. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांनीही काल गौरी खानच्या डिझायनर स्टोअरला भेट दिली. आज शाहरुख खान त्याचा आगामी सिनेमाच्या नावाची घोषणा करणार आहे. आनंद एल राय दिग्दर्शित या सिनेमात किंग खानसोबत अनुष्का शर्मा आणि कतरिना कैफही दिसणार आहेत. (छाया सौजन्य- वरिंदर चावला)
-
२०१७ ची सांगता अभिषेक आणि ऐश्वर्याच्या भेटीने झाली असे ट्विट गौरीने केले. गौरी खान, शाहरुख खान, ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना धिरुभाई अंबानी शाळेतील वार्षिक स्नेहसंमेलनासाठी उपस्थित होते. आराध्या आणि अब्राम हे त्याच शाळेत शिकतात. (छाया सौजन्य- वरिंदर चावला)
-
आलिया भट्टसाठी २०१७ हे वर्ष फारंच खास होतं. तिचा बद्रिनाथ की दुल्हनिया हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला. तसेच लगेच तिने पुढील सिनेमांच्या चित्रीकरणाला सुरूवात केली. २०१६ हे वर्षही आलियासाठी चांगलं होतं. 'डिअर जिंदगी', 'कपूर अॅण्ड सन्स' आणि 'उडता पंजाब' अशा हिट सिनेमांमध्ये तिने काम केलं होते. (छाया सौजन्य- वरिंदर चावला)
-
आलियाने 'हायवे', 'उडता पंजाब' आणि '२ स्टेट्स' या सिनेमांतून स्वत:ची अभिनयक्षमता सिद्ध केली. (छाया सौजन्य- वरिंदर चावला)
-
सध्या स्टार किड सारा अली खानच्याच नावाची चर्चा बी- टाऊनमध्ये पाहायला मिळत आहे. (छाया सौजन्य- वरिंदर चावला)
-
सैफ अली खानची मुलगी सारा यावर्षी 'केदारनाथ' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या सिनेमात तिच्यासोबत सुशांत सिंग राजपूतही असणार आहे. (छाया सौजन्य- वरिंदर चावला)
-
बॉलिवूडचे हॉट कपल बिपाशा बासु आणि करण सिंग ग्रोवर यांनीही मुंबईतच नवीन वर्षाचे स्वागत केले. (छाया सौजन्य- वरिंदर चावला)

बाई…कसली नाचली! ‘एक नंबर तुझी कंबर’ गाण्यावर तरूणीने धरला ठेका; VIDEO पाहून कराल कौतुक