-
अभिनेत्री दीपिका पदुकोणचा आनंद सध्या द्विगुणीत झाल्याचे चित्र आहे. एकीकडे तिच्या पद्मावत चित्रपटाने १०० कोटींचा गल्ला पार केला असून, तिचे वडील आणि प्रसिद्ध बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाने प्रकाश पदुकोण यांना लाइफटाइम अचिव्हमेंट पुरस्काराने नुकतेच सन्मानित केले. यावेळी आपल्या वडिलांचा उपाध्यक्ष व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते सन्मान होताना पाहून दीपिकाला तिचे अश्रू अनावर झाले.
-
नवी दिल्लीत झालेल्या या सोहळ्याला दीपिका, तिची आई उजाला आणि बहिण अनिषा यासुद्धा उपस्थित होत्या. सिल्क साडीमध्ये यावेळी दीपिकाचे सौंदर्य अधिकच खुलून आले होते.
-
ऑलिम्पिक २०१६मध्ये रौप्यदक पटकावणारी पीव्ही सिंधूसुद्धा कार्यक्रमाला उपस्थित होती.
-
दीपिकाने उपाध्यक्ष व्यंकय्या नायडू यांची भेट घेतली.
-
'द पदुकोण्स' – प्रकाश पदुकोण यांच्यासह उजाला, दीपिका आणि अनिषा ग्रुप फोटोसाठी कॅमेऱ्यास पोज देताना.
-
वडिलांना पुरस्कार मिळत असताना फोटो काढताना दीपिका.
-
आपल्या वडिलांचा सन्मान होत असल्याचा आनंद दीपिकाच्या चेहऱ्यावर दिसून येत होता.

Pakistan Flood : निसर्गाला हलक्यात घेऊ नका! एकाच कुटुंबातील ९ जण डोळ्यादेखत गेले वाहून, मन हेलावून टाकणारा Video आला समोर