बॉलिवूडमध्ये पुरस्कार सोहळा म्हटलं की तिथे कोणत्या सेलिब्रिटीला कोणता पुरस्कार मिळणार याहून ते सेलिब्रिटी पुरस्कार सोहळ्यात कोणत्या नव्या रुपात दिसणार याचीच जास्त उत्सुकता अनेकांना लागून राहिलेली असता. सध्या बी- टाऊनमध्ये असाच एक पुरस्कार सोहळा पार पडला. ज्याच्या रेड कार्पेटवर शाहरुख खान, गौरी खान यांच्यापासून ते सौंदर्यांचा एक सुरेख नजराणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांची उपस्थिती पाहायला मिळाली. 'हॅलो हॉल ऑफ फेम अवॉर्ड्स २०१८' या पुरस्कार सोहळ्यात बऱ्याच सेलिब्रिटींनी हजेरी लावली. पण, रेड कार्पेटवर दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग पुन्हा एकदा सुपरहिट ठरले. (छाया : Varinder Chawla) -
शाहरुख खान आणि गौरी खान (छाया : Varinder Chawla)
-
रणवीर सिंगने रेड कार्पेटवर 'डॅब' करत, अनोख्या अंदाजात पुरस्कार सोहळ्यात एंट्री केली. (छाया : Varinder Chawla)
-
दीपिकाच्या अदांची जादू पुन्हा पाहायला मिळाली. (छाया : Varinder Chawla)
-
चिरतरुण सौंदर्यवती, रेखा (छाया : Varinder Chawla)
-
'सोनू के टिट्टू की स्वीटी' फेम जोडी, कार्तिक आर्यन आणि नुसरत भरुचा. (छाया : Varinder Chawla)
-
'पॉप्युलर चॉईस' या पुरस्काराने अभिनेता राजकुमार रावला गौरविण्यात आलं. (छाया : Varinder Chawla)
-
सिद्धार्थ मल्होत्राला 'मोस्ट स्टायलिश मॅन ऑफ द इयर' हा पुरस्कार देण्यात आला. (छाया : Varinder Chawla)
-
या पुरस्कार सोहळ्यात 'स्टाइल आयकॉन ऑफ द इयर' ठरली, अभिनेत्री क्रिती सनॉन. (छाया : Varinder Chawla)
-
लूलिया वंतूर (छाया : Varinder Chawla)
-
निर्माता, दिग्दर्शक करण जोहरला 'मोस्ट व्हर्सटाइल पर्सनालिटी ऑफ द इयर' या पुरस्काराने गौरविण्यात आलं. (छाया : Varinder Chawla)
-
अभिनेता शाहिद कपूरच्या अनुपस्थितीत त्याची पत्नी मीरा राजपूत हिने त्याचा पुरस्कार स्वीकारला. (छाया : Varinder Chawla)

Devendra Fadnavis : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची रोखठोक भूमिका; म्हणाले, “राजकारण चुलीत गेलं, पण…”