-
नितीन चंद्रकांत देसाई यांच्या संकल्पनेतून कर्जत येथील एन.डी.स्टुडिओतील बॉलिवूड थीमपार्कमध्ये अभिनेता गोविंदाच्या हस्ते भव्य गुढी उभारण्यात आली.
-
नववर्षानिमित्त स्टुडिओत २ दिवसांचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. आज गुढीपाडव्यानिमित्त गोविंदाच्या हस्ते ५१ फूट लांबीची गुढी उभारण्यात आली.
-
या थीमपार्कात शोभायात्रादेखील काढण्यात आली.
-
या थीमपार्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीचा पारंपरिक पद्धतीने पाहुणचार करण्यात आला.
-
सामान्य प्रेक्षकांसाठी खुले करण्यात आलेल्या या थीमपार्कमध्ये केवळ हिंदीच नव्हे तर अखंड भारतीय चित्रपटसृष्टीचा इतिहास पाहायला मिळतो.
-
कृष्णधवल ते रंगीत अशी भारतीय चित्रपटसृष्टीच्या दीर्घ प्रवासाची सफर यात घडत असून, फिल्मी परेडचा रोमांचित करणारा अनुभव प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरत आहे.
-
मोठ्या पडद्यावर दिसणारे भव्य राजवाडे आणि गड किल्ल्यांचे सेट्स येथे उभारण्यात आले असून, सिनेरासिकांसाठी हे सर्व सेट्स कुतूहलाचा विषय ठरत आहे.
-
सिनेमातील स्टंट, नाचगाणी तसेच अॅक्शनपटात सिनेरसिकांना स्वतः सहभाग घेता येत असल्यामुळे, सिनेचाहत्यांसाठी एन.डी. स्टुडीओतील हे बॉलिवूड थीमपार्क पर्यटनासाठी उत्तम ठिकाण ठरत आहे.

पुढील २३ महिन्यांच्या काळात होणार नुसता धनलाभ; शनीदेवाचे गोचर ‘या’ तीन राशींना देणार करिअर,व्यवसायात यश