‘दृश्यम’ फेम अभिनेत्री श्रिया सरनने प्रियकर अँड्री कोसचीवशी लग्नगाठ बांधली आहे. दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये सुपरहिट ठरलेल्या श्रिया रशियन प्रियकर अँड्रीसोबत विवाहबद्ध झाली. सोशल मीडियावर श्रियाच्या लग्नाचे फोटो सध्या व्हायरल होत आहे. हिंदू विवाहपद्धतीनुसार श्रिया आणि अँड्रीने लग्नगाठ बांधल्याचे या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे. श्रियाच्या हळद आणि मेहंदी कार्यक्रमातील हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अँड्री हा रशियातील एक प्रसिद्ध व्यावसायिक आहे. डोमावकुस्नी या प्रसिद्ध रेस्तराँचा तो संस्थापक आहे. या रेस्तराँच्या अनेक शाखाही आहेत. याशिवाय अँड्री राष्ट्रीय स्तरावरील टेनिसपटूही आहे. श्रियाने बॉलिवूडमध्ये कमी काम केले असले तरी दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील ती एक नावाजलेली अभिनेत्री आहे. श्रियाने अनेक तेलुगू, तमिळ, कन्नड चित्रपटांमध्ये काम केले आहे. सोशल मीडियावर श्रियाच्या चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Maharashtra Breaking News Live Updates: “…तर कानाखालीच बसणार”, मीरारोड मोर्चातून मनसेचा नारा