-
दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनचा आज वाढदिवस. या 'स्टायलिश स्टार'चे असंख्य चाहते आहेत. तरुणींच्या गळ्यातील ताईत असलेल्या अल्लू अर्जुनचा जन्म ८ एप्रिल १९८३ रोजी चेन्नईत झाला.
-
हा दाक्षिणात्य कलाकार त्याच्या स्टायलिश अंदाज आणि आलिशान राहणीमानासाठी विशेष ओळखला जातो.
-
अल्लू अर्जुन साऊथ सुपरस्टार चिरंजीवी यांचा भाचा आहे.
-
६ मार्च २०११ रोजी अल्लू अर्जुनने हैदराबादमध्ये स्नेहा रेड्डीशी लग्न केले. त्याला अयान हा मुलगा आणि आऱ्हा ही मुलगी आहे.
-
अर्जुनच्या ‘दुव्वदा जगन्नधाम’ चित्रपटाच्या म्युझिक लाँचच्या कार्यक्रमात त्याचा मुलगा अल्लू आर्यनदेखील उपस्थित होता. या कार्यक्रमाच्या शेवटी अगदी अल्लू अर्जुनप्रमाणेच त्याने मंचावरून जाताना प्रेक्षकांना हात दाखवून त्यांचे आभार मानले. हे पाहून स्वत: अर्जुनसुद्धा आश्चर्यचकित झाला होता.
-
२०१६ मध्ये 'गूगल'वर सर्वाधिक सर्च केला जाणारा टॉलिवूड सेलिब्रिटी अल्लू अर्जुन होता. त्याच वर्षी फोर्ब्स इंडियाच्या मासिकातही त्याचा समावेश होता.
-
विविधभाषी प्रेक्षकांवर छाप पाडण्यात यशस्वी ठरलेल्या या दाक्षिणात्य सेलिब्रिटीला महागड्या गाड्याचं प्रचंड वेड आहे.

“कर्म करायला गेली पण पाप झालं…” पाऊस पडत होता म्हणून माकडाला छत्री दिली; पुढच्याच क्षणी माकड थेट हवेत, शेवटी काय झालं पाहा