फॅशनच्या दुनियेमध्ये मराठमोळ्या सई ताम्हणकरकडे सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून पाहिलं जातं. मराठी चित्रपटसृष्टीमध्ये स्वत:चा स्वतंत्र ठसा उमटविल्यानंतर सईने बॉलिवूडकडे वाटचाल सुरु केली आहे. सई लवकरच 'लव सोनिया' या चित्रपटामध्ये झळकणार आहे. ग्लोबली प्रसिद्धी मिळाल्यामुळे सईला यंदाच्या 'लॅक्मे फॅशन वीक'मध्ये झळकण्याची संधी मिळाली. यावेळी तिला एक नव्हे तर तब्बल तीन फॅशन डिझायनर्सकडून आमंत्रण आलं होतं. मोनोक्रोमॅटिक ड्रेससोबत पोनीटेल आणि ब्लू आयलाइनरमुळे तिचा एलिगन्ट लूक दिसून येत होता. सई फॅशन डिझायनर पुनीत बलानाच्या शोमध्ये मोनोक्रोमॅटिक ग्राफिक शॉर्ट ड्रेसमध्ये आली होती. सईच्या या स्टनिंग लूकमुळे ती फॅशन ब्लोगर्सच्या आकर्षणाचे केंद्र बनली होती. पुनीत बलानानंतर सईने दिशा पाटील आणि जुली शाहा यांचाही फॅशन शो अटेंड केला.

‘या’ भयंकर आजारानं शिरीष गवसचा मृत्यू; सुरुवातीलाच दिसतात ६ जीवघेणी लक्षणे, दुर्लक्ष न करता लगेच जाणून घ्या