वय हा निव्वळ एक आकडा असतो, हे मलायका अरोराकडे पाहून कळते. आपल्या चित्रपटांनी आणि आयटम नंबर्सने या सुंदर आणि फिट असणाऱ्या अभिनेत्रीने सर्वांचे मनोरंजन केलेय. आज ही सौंदर्यवती ४५ वर्षांची झाली आहे. वयाची चाळीशी ओलांडलेली मलायका आजही एखाद्या तरुण अभिनेत्रीप्रमाणे ग्लॅमरस अंदाजात दिसून येते. ग्लॅमरस अंदाजाने भूरळ घालणारी मलायका एमटीव्ही इंडिया लाँच झालं तेव्हा तिने व्हिजे म्हणून तेथे काम केलं होतं. त्यानंतर तिने अनेक कार्यक्रमांचे सहसूत्रसंचालनही केले. बॉलिवूडमध्ये 'छैय्या छैय्या' ते 'मुन्नी बदनाम हुई' पर्यंत मलायकाचं प्रत्येक गाणं सुपरहिट ठरलं आहे. त्यात 'गुर नाल इश्क मिठा', 'आयो रे मारो ढोल ना', 'प्यार के गीत' ही तिची काही प्रसिद्ध गाणी आहेत. मलायकाने १९९८ साली अरबाज खानशी लग्न केले होते. एका कॉफी जाहिरातीच्या दरम्यान या दोघांची ओळख झाली आणि त्यानंतर त्याचे प्रेमात रुपांतर झाले. परंतु तब्बल १८ वर्षांनंतर ते विभक्त झाले. मलायका आणि अरबाजला अरहान हा मुलगा आहे. घटस्फोटानंतर मलायका आयुष्याचा पुरेपूर आनंद घेत असून, ती अनेक वेळा सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असल्याचं पाहायला मिळतं. बॉलिवूडमधील हॉट कपल म्हणून मलायका आणि अरबाजकडे पाहिलं जात होतं.

Throat Cancer: घशाचा कॅन्सर होणार असेल तर दिसतात ही ५ लक्षणं; साधारण वाटणारी पण जीवघेणी, वेळीच ओळखलं तर वाचू शकतो जीव