
अभिनेता आयुषमान खुरानाचा 'बधाई हो' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ८६.८५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे नुकतच या चित्रपटाच्या सक्सेस पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीत आयुषमानच्या आईची भूमिका पार पाडणाऱ्या नीना गुप्ता यांनी हजेरी लावली होती. 
या पार्टीमध्ये चित्रपटाच्या दिग्दर्शकांसह संपूर्ण टीम उपस्थित होती. यावेळी पार्टीमध्ये आयुषमान डॅगिंश आणि स्टायलिश अंदाजात दिसून आला. 
सान्या मल्होत्राही अत्यंत सुंदर आणि डिसेंट लूकमध्ये या पार्टीला आली होती. या चित्रपटातील आयुषमान आणि सान्याची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीत उतरली असून पुन्हा एकदा त्यांना एकत्र पाहण्याची चाहत्यांची इच्छा आहे. 
अभिनेता गजराज रावदेखील उपस्थित होते. 
शार्दुल राणा आणि अभिनेत्री सुरेखा सीकरी 
चित्रपट दिग्दर्शक बोनी कपूर यांनी देखील या पार्टीत सहभाग घेतला होता.
“अजय देवगण १८ वर्षांपासून माझ्याशी बोलत नाही, माझ्या करिअरमधील सर्वात वाईट…”