बॉलिवूड अभिनेत्री सुरवीन चावला लवकरच आई होणार आहे. एप्रिलमध्ये तिच्या बाळाचं आगमन होणार असून नुकतचं सुरवीनच्या डोहाळ जेवणाचा कार्यक्रम पार पडला सुरवीनने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून डोहाळ जेवणाचे फोटो शेअर केले. या फोटोला तिने, ‘द गोद भराई,’ असं कॅप्शन दिलं आहे. या फोटोमध्ये सुरवीनने मस्टर्ड कलरची साडी नेसली असून त्यावर गुलाबी रंगाचं ब्लाऊज घातलं आहे. सुरवीनने या आऊट फिटवर हिरव्या रंगाच्या दागिन्यांना प्राधान्य दिलं होतं. फोटोमध्ये तिचा बेबी बंप स्पष्ट दिसत होता. पारंपारिक पद्धतीने सुरवीनचं डोहाळ जेवण पार पडलं असून तिच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्टपणे दिसून येत होता. सुरवीनने 'हेट स्टोरी २', 'पार्च्ड' आणि 'अगली' या चित्रपटात झळकलेल्या सुरवीनने २०१५ मध्ये व्यावसायिक अक्षय ठक्करसोबत लग्नगाठ बांधली.

HSRP Number Plate News: ‘एचएसआरपी’ पाटीबाबत मोठी घडामोड… मुदतवाढ मिळाल्याने ‘या’ तारखेपर्यंत…