मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस आणि बोल्ड अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. सईने तिच्या अभिनयाने आणि हॉट लूकमुळे अनेकांना घायाळ केलं असून तिने नुकतच एक फोटोशूट केलं आहे. सईने ‘क्लासी बॉस बेब’ फोटोशूट केलं आहे. केवळ मराठीच नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीतही सई आपल्या अभिनयाचा ठसा उमटवत आहे. सईने फेब्रुवारी महिन्यात सोशल मीडियावरून ती डिजीटल डिटॉक्सवर जात असल्याचे जाहीर केले होतं. एक महिना डिजीटल डिटॉक्सवर गेलेल्या सईने या दरम्यान पाँडेचरीला जाऊन सचिन कुंडलकरांच्या आगामी सिनेमाचे चित्रीकरण केले. नुकतचं मुंबईत परतलेल्या सईने ‘क्लासी बॉस बेब’ फोटोशूट केलं असून तिच्या फोटोची चांगलीच चर्चा रंगली आहे.

“…तर उद्याच भारताची २५ टक्के टॅरिफमधून सुटका”, डोनाल्ड ट्रम्प यांच्या सल्लागाराचं मोठं विधान; घातली ‘ही’ अट!