 - होळी म्हणजे आनंदाचा, मांगल्याचा सण. या दिवशी प्रत्येकाच्या घरात उत्साहाचं वातावरण पसरलं असते. 
 - होळीची पूजा झाल्यानंतर साऱ्यांना वेध लागतात ते रंगपंचमीचे. या दिवशी सामान्य नागरिकांपासून सेलिब्रिटींपर्यंत साऱ्यांमध्येच उत्साहाचं वातावरण पसरलं असतं. हाच उत्साह चित्रपट दिग्दर्शक रवी जाधवमध्ये दिसत असून त्याने यंदा 'स्पेशल' रंगपंचमी सेलिब्रेट केल्याचं पाहायला मिळत आहे. 
 - रवी जाधवने ठाण्यातील 'जिद्द' या शाळेतील स्पेशल चाईल्डसोबत ही रंगपंचमी सेलिब्रेट केली आहे. 
 - होळी सेलिब्रेशनचे काही फोटो रवीने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. 
 - अस्सल निरागस हसणे केवळ इथे पहायला मिळते. आमची ठाण्यातील ‘जिद्द’ शाळेतील ‘स्पेशल’ रंगपंचमी.कारण आपण सगळेच ‘स्पेशल’ आहोत!!! , असं सुंदर कॅप्शन रवीने या फोटोला दिलं आहे. 
 - फोटोमध्ये कोणी लाल, हिरव्या, पिवळ्या रंगात रंगलं आहे. तर कोणी आनंदाच्या रंगात न्हाऊन निघालं आहे. 
-    
-    
-    
 - रवीसोबत या मुलांनी रंगपंचमीचा चांगलाच आनंद लुटल्याचं एकंदरीत दिसून येत आहे. 
 
  INDW vs AUSW: भारत वर्ल्डकप जिंकला तर मी जेमिमा रॉड्रिग्जबरोबर.., सुनील गावसकरांनी दिलं वचन 
   
  
  
  
  
   
   
   
   
   
   
  