कलाविश्वातील मानाचा फिल्मफेअर पुरस्कार २०१९ नुकताच पार पडला. या सोहळ्याची रंगत काही औरच असते. त्यामुळे फिल्मफेअरच्या रेड कार्पेटवर अनेक तारेतारकांनी त्यांच्या नव्या स्टाईलमुळे चाहत्यांची मन जिंकली. २०९ या वर्षाच्या सुरुवातीलाच 'गली बॉय' आणि 'सिम्बा' सारखे सुपरहिट चित्रपट देणारा अभिनेता रणवीर सिंग कायमच त्याच्या नवनवी स्टाईलसाठी ओळखला जातो. या सोहळ्यामध्येही त्याचा असाच हटके लूक पाहायला मिळाला.या सोहळ्यात त्याला फिल्मफेअरचा बेस्ट अॅक्टर (critics) अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं. 'बियॉन्ड द क्लाऊड'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा अभिनेता इशान खट्टरही या सोहळ्याला उपस्थित होता. यावर्षी फिल्मफेअरचा बेस्ट डेब्यू अॅक्टरचा पुरस्कार इशान खट्टरला मिळाला. इशानप्रमाणेच सारा अली खानलादेखील यावर्षीचा बेस्ट डेब्यू अॅक्ट्रेसचा अवॉर्ड मिळाला. तिनं २०१८ मध्ये 'केदरनाथ' मधून बॉलिवूड पदार्पण केलं होतं. उरी फेम विकी कौशलनही फिल्मफेअर अवॉर्ड २०१९ ला हजेरी लावली. विकीला 'संजू' सिनेमासाठी यावर्षीचा सर्वोत्कृष्ट सहाय्यक कलाकाराचा पुरस्कार मिळाला. 'धडक' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी जान्हवी कपूरनेदेखील या सोहळ्याला उपस्थिती दर्शविली होती. यावेळी तिने परिधान केलेल्या गाऊनने उपस्थितांची मनं जिंकली. -

HSRP Number Plate News: ‘एचएसआरपी’ पाटीबाबत मोठी घडामोड… मुदतवाढ मिळाल्याने ‘या’ तारखेपर्यंत…