तब्बल दोन दशके बॉलिवूडवर अधिराज्य गाजविणाऱ्या अजयचा आज वाढदिवस. १९९१ साली 'फूल और कांटे' या चित्रपटातून अजयने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 'फूल और कांटे' या पहिल्या चित्रपटातील अभिनयाबद्दल त्याला पदार्पणातील सर्वोकृष्ट अभिनेता म्हणून फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. अजयने वेगवेगळ्या धाटणीच्या चित्रपटांमध्ये काम करुन आपल्यातील अभिनयाची चुणूक दाखवून दिली. महेश भट्ट यांच्या ‘जख्म’ चित्रपटातील भूमिकेबद्दल त्याला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. १९९९ नंतर अॅक्शन हिरोच्या चित्रपटामध्ये प्रेमाचे रंग दिसू लागले. त्यातीलच एक चित्रपट म्हणजे ‘हम दिल दे चुके सनम’. याशिवाय ‘गंगाजल’, ‘सिंघम’ या चित्रपटातून बेधडक अधिकारी साकारत त्याने तरुणाईच्या मनात एक वेगळी छाप सोडली.

Mumbai Rain Live Updates : मुंबई आणि परिसरात इतका पाऊस का कोसळतोय? हवामान विभागाने दिली महत्त्वाची अपडेट