बॉलिवूडचं ऐश्वर्य अर्थात ऐश्वर्या राय -बच्चन सध्या पती अभिषेक आणि मुलगी आराध्यासह मालदीवमध्ये क्वॉलिटी टाईम एन्जॉय करत आहे. ऐश-अभिच्या लग्नाचा १२ वा वाढदिवस असल्यामुळे तो सेलिब्रेट करण्यासाठी त्यांनी मालदीवची निवड केली. व्हॅकेशनचे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. स्वीमिंग पूलमधील ऐश्वर्या-आराध्याचा फोटो सध्या व्हायरल होत असून या फोटोला अभिषेकने 'हॅप्पीनेस…माय गर्ल्स' अशी समर्पक कॅप्शनही दिली आहे. ऐश -अभिषेकच्या लग्नाला १२ वर्ष झाली असून लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापासून आजपर्यंत दोघांनीही हा दिवस खास करण्यासाठी वेगवेगळं प्लॅनिंग केल्याचं पाहायला मिळालं आहे. ऐश्वर्या राय आणि अभिषेकने २० एप्रिल २००७ रोजी रेशीमगाठी बांधली. उत्तर भारतीय आणि बंगाली पद्धतीने दोघांचं शुभमंगल पार पडलं होतं.

IND vs AUS, Match Timings: भारत- ऑस्ट्रेलिया वनडे सामना किती वाजता सुरू होणार?