-    मराठी कलाविश्वातील सर्वात लोकप्रिय आणि तितकाच गाजणारा रिअॅलिटी शो म्हणजे बिग बॉस मराठी. वादग्रस्त पण तेवढाच लोकप्रिय ठरलेल्या या शोचं सूत्रसंचालन यावेळीदेखील महेश मांजरेकर करणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांची या शोविषयीची उत्सुकता कमालीची वाढली आहे. मात्र प्रेक्षकांना सर्वात मोठी उत्सुकता लागली आहे ती बिग बॉसच्या घराची. यावेळी बिग बॉसचं नवं घरं कसं असेल याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. आज आम्ही तुम्हाला बिग बॉसच्या याच घराची सफर घडवून आणणार आहोत. 
-    यावेळी बिग बॉसच्या घराला भव्य दिव्य वाड्याचं स्वरुप देण्यात आलं आहे. हा सेट तब्बल १४ हजार चौरस फूट अशा भव्य जागेमध्ये उभारण्यात आला आहे. या घराला आलिशान अस्सलं मराठमोळ्या वाड्याचे स्वरूप देण्यात आले. याव्यतिरिक्त, एक भव्य सेट तयार करण्यात आला आहे ज्याद्वारे महेश मांजरेकर स्पर्धकांशी संवाद साधतील. 
-    पारंपरिक पदधतीने सजवलेल्या या घराला कौलारू छप्पर पाहायला मिळतंय. घराच्या आत प्रवेश करण्यापूर्वी लॉनमध्ये व्यायामशाळा, तुळशी वृंदावन, स्विमिंग पूल, पाळणा आणि काराग्रृह पाहायला मिळतं. या काराग्रृहात एक कंदिल आणि एक चटई आहे. हे काराग्रृह नेमकं कशासाठी आहे हे शोमध्ये आपल्याला समजेलच.. बाहेर एक हातगाडीसुद्धा आहे.. ज्यावर गोधडीच्या डिझाईनप्रमाणे गादी ठेवण्यात आली आहे 
-    घराला द्रृष्ट लागू नये म्हणून लिंबू मिरचीसुदधा प्रवेशद्वाराला लावलेली आहे. 
-    आता पाहुयात बिग बॉसच्या घराचा हॉल… कौलारू छप्पराची डिजाइन, मोठ्या खिडक्या, छपरावर क्रृत्रिम पक्षी, मोठा सोफा आणि त्यावर रंगीबेरंगी उश्या आहेत. याच सोफ्यावर बसून स्पर्धक महेश मांजरेकर यांच्याशी संवाद साधतील. 
-    हॉलमधून कन्फेशन रूमकडे जाणाऱ्या मार्ग वर मोठा बाजूबंद पाहायला मिळतो. आणि त्याच मार्गाने पुढे जाताना आजूबाजूच्या भिंतींवर मोठ मोठ्या डोळ्यांची डिझाइन पाहायला मिळते. बिग बॉसची नजर ही सतत स्पर्धकांवर असते याचंच जणू ते प्रतिक आहे. 
-    हॉलमधील एका भिंतीवर विविध मराठी शब्दांची डिजाइन पाहायला मिळते. आई, विद्या, शांती, योग अशा विविध शब्दांवर एक वीणासुदधा आहे 
-    आता वळूयात किचनकडे.. घराप्रमाणेच किचनसुद्धा पारंपरिक रित्या डिजाइन करण्यात आला आहे. फ्लॉवरपॉट नाही तर तांब्यांमध्ये फुलं ठेवली आहेत.. उखळ, मातीची भांडी, पाटा वरवंटा, काचेच्या बरण्या, चहाच्या किटल्या हे सर्व किचनमध्ये पाहायला मिळतंय. त्याचसोबत एका बाजूला लिंबाचं कुत्रिम झाड आहे. या झाडाखाली बसून चहा – कॉफी पिण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. 
-    किचननंतर पाहुयात बेडरुम कसे आहेत… पुरुषांच्या बेडरुमला पिवळा रंग देण्यात आला आहे. भिंतींवर चित्रकाम करण्यात आलं आहे… तर महिलांच्या बेडरुमला नीळा रंग आहे.. बेडरुमच्या भिंतीवर मोठं घुंगरू आहे.. लावणीसम्राद्नी यंदा बिग बॉसच्या घरात आहे.. त्यामुळे घर डिजाइन करताना स्पर्धकांचा पूरणपणे विचार केला गेलाय.. तसंच मोठी नथसुद्धा पाहायला मिळतेय 
-    बिग बॉसच्या घराच्या बाथरुममध्यो एका भिंतीवर बांगड्या पाहायला मिळत आहेत.. गेल्या सिझनमध्ये कोल्हापुरी चपलांनी ही भिंत सजवण्यात आली आहे. 
-    बिग बॉसच्या घरातील सर्वात महत्वाची जागा म्हणजे कारागृह. तसेच याला 'अडगळीची खोली' अशी पाटी लावण्यात आली आहे. 
-    एकंदरीत संपूर्ण घर फ्रेश रंग, फुलांच्या पक्षांच्या पेंटिंगने सजवण्यात आली 
-    बिग बॉसच्या घराप्रमाणेच यंदाचा सिझनपण नाविण्यपूर्ण असेल यात काही शंका नाही 
 
  PM Modi on Sanjay Raut: संजय राऊत यांच्या गंभीर आजाराच्या पोस्टवर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया; म्हणाले, “प्रार्थना करतो की…” 
   
  
  
  
  
   
   
   
   
   
   
  