
बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता अर्जुन कपूरचा आज वाढदिवस 
अर्जुन बोनी कपूर आणि मोना शौरी कपूर यांचा मुलगा असून बोनी कपूर बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट निर्माते आहेत. 
२०१२ मध्ये 'इश्कजादे' या चित्रपटातून अर्जुनने कलाविश्वामध्ये पदार्पण केलं. 
'इश्कजादे' या चित्रपटामध्ये त्याने वठविलेल्या भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीचा फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळालं होतं. 
सध्या कलाविश्वामध्ये अर्जुन आणि अभिनेत्री मलायका अरोरा यांच्या नात्याविषयी अनेक चर्चा रंगत आहेत. 
अर्जुन लवकरच 'पानिपत' या चित्रपटामध्ये झळकणार आहे. या चित्रपटामध्ये त्याच्यासोबत संजय दत्तसुद्धा दिसणार आहे.
अगं बाई! साडीतील काकूंचा ठुमका पाहून थक्क झाले नेटकरी; VIDEO पाहून म्हणाले “आंटी तर लहानपणी…..