'कैसी है यारियाँ' या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण करणारी अभिनेत्री निती टेलर लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. -
सोशल मीडियावर पोस्टद्वारे तिने चाहत्यांना साखरपुडा करत असल्याची माहिती दिली. साखरपुडा पार पडण्यासाठी सोमवारी नितीचा मेहंदी कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
परिक्षित बावा असं नितीच्या होणाऱ्या पतीचं नाव असून मेहंदीच्या कार्यक्रमासाठी दोघांनी एकसारख्या रंगाचे कपडे परिधान केले होते. 'कैसी है यारियाँ' या मालिकेत नितीने साकारलेल्या नंदिनीच्या भूमिकेने तरुणाईला भुरळ पाडली होती. मालिकेत मुख्य भूमिका साकारणारा पार्थ समथान आणि निती यांच्यातील केमिस्ट्रीमुळे ही मालिका खूप गाजली. -
अभिनेत्री चांदनीने या मेहंदी कार्यक्रमात हजेरी लावली
-
या कार्यक्रमासाठी नितीने हिरव्या रंगाचा लेहंगा परिधान केला होता.
-
निती टेलरवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Trump Tariffs: ट्रम्प यांच्या राजकीय दबावाला मोदी सरकार ‘असं’ देणार उत्तर; घेतले तीन महत्त्वाचे निर्णय