बॉलिवूडमध्ये आजवर अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी यशाचं शिखर सर केलं आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत त्यांच्या मुलींनीदेखील या क्षेत्रात पदार्पण केलं. विशेष म्हणजे या अभिनेत्री हुबेहूब त्यांच्या आईप्रमाणे दिसतात. त्यामुळे या अभिनेत्रींना पडद्यावर पाहिल्यानंतर चक्क त्यांच्या आईच पडद्यावर अभिनय करत असल्याचा भास होतो. ट्विंकल खन्ना – राजेश खन्ना यांची लेक ट्विंकल खन्ना अगदी आई डिंपल कपाडिया यांच्यासारखी दिसते. विशेष म्हणजे ट्विंकल आईप्रमाणेच लोकप्रिय अभिनेत्री आहे. (सौजन्य : ट्विंकल खन्ना फेसबुक पेज) श्रुती हासन – दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेत्री म्हणून श्रुती हासनकडे पाहिलं जातं. श्रुती कमल हासन आणि सारिका यांच लेक आहे. श्रुती हुबेहूब आई सारिका यांच्याप्रमाणे दिसते. (सौजन्य : सोशल मीडिया) सोहा अली खान – शर्मिला टागोर यांची लेक सोहा अली खान ही सेम आईप्रमाणेच दिसते. सोहाचं लग्न झालं असून तिला एक लहानशी मुलगीदेखील आहे. मात्र आजही ती तितकीच छान दिसते. (सौजन्य : सोहा अली खान फेसबुक पेज) आलिया भट- आलिया भट्ट हे महेश भटयांची लेक असून ती सेम आई सोनी राजदान यांच्यासारखी दिसते. आलिया सध्याच्या तरुणाईमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिच्याप्रमाणेच सोनी राजदानदेखील अभिनेत्री असून राझी या चित्रपटात या दोघी मायलेकींनी एकत्र काम केलं होतं. (सौजन्य : आलिया भट फेसबुक पेज) सारा अली खान – अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची लेक म्हणजे सारा अली खान. साराने केदारनाथ या चित्रपटातून कलाविश्वात पदार्पण केलं. तिच्या या पहिल्याच चित्रपटाने तिला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. दिसायला गोड असलेली सारा हुबेहूब आपल्या आईसारखी दिसते. अमृता सिंगने ९० चा काळ गाजवला असून त्याकाळी त्यांचे असंख्य चाहते होते. ( सौजन्य : सारा अली खान फेसबुक पेज) श्रद्धा कपूर – तरुणांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री आपल्या आईचा चेहरा घेऊनच जन्माला आली आहे. श्रद्धा ही शक्ती कपूर आणि शिवांगी कोल्हापुरे यांची लेक आहे. (सौजन्य : सोशल मीडिया)

लिव्हर खराब झालं तर पायांमध्ये दिसतात ‘ही’ ६ लक्षणे! दुर्लक्ष केलं तर होतील वाईट परिणाम