अभिनेता अजय देवगणची मुख्य भूमिका असलेला ‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ हा ऐतिहासिकपट अलिकडेच प्रदर्शित झाला. अभिनेता अजय देवगण आणि काजोलसोबतच यात काही मराठी कलाकारही झळकले आहेत. या कलाकारांमध्ये अभिनेत्री भाग्यश्री न्हालवेचादेखील समावेश आहे. (सौजन्य: भाग्यश्री न्हालवे फेसबुक पेज) छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री असलेल्या भाग्यश्रीने या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं. (सौजन्य: भाग्यश्री न्हालवे फेसबुक पेज) 'तान्हाजी'च्या निमित्ताने मराठमोळी अभिनेत्री भाग्यश्री न्हालवेला अजय आणि काजोलसोबत काम करण्याची संधी मिळाली. (सौजन्य: भाग्यश्री न्हालवे फेसबुक पेज) 'तान्हाजी'मध्ये भाग्यश्रीने सूर्याजी मालुसरे यांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. तर मराठमोळा अभिनेता देवदत्त नागेने सूर्याजी मालुसरे यांची व्यक्तिरेखा वठविली आहे. (सौजन्य: भाग्यश्री न्हालवे फेसबुक पेज) विशेष म्हणजे या चित्रपटातील तिचा लूक आणि अभिनय पाहून तिची ओळख पटणं अवघड आहे. (सौजन्य: भाग्यश्री न्हालवे फेसबुक पेज) भाग्यश्री अनेक मालिका आणि वेबसीरिजमध्ये झळकली आहे. (सौजन्य: भाग्यश्री न्हालवे फेसबुक पेज) (सौजन्य: भाग्यश्री न्हालवे फेसबुक पेज) छोट्या पडद्यावरील कुंकू, टिकली आणि टॅटू या मालिकेमधून ती प्रत्येकाच्या घराघरात पोहोचली. (सौजन्य: भाग्यश्री न्हालवे फेसबुक पेज) मालिकांसोबतच ती 'स्त्रीलिंग पुल्लिंग' या मराठी वेबसीरिजमध्येही झळकली आहे. (सौजन्य: भाग्यश्री न्हालवे फेसबुक पेज) (सौजन्य: भाग्यश्री न्हालवे फेसबुक पेज) भाग्यश्री सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असून ती बऱ्याचदा तिचे फोटो शेअर करत असते. (सौजन्य: भाग्यश्री न्हालवे फेसबुक पेज) अलिकडेच भाग्यश्रीचा 'परफ्युम' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. इतकंच नाही तर या नवीन वर्षात तिचा 'अरेंज मॅरेज' हा चित्रपटही प्रदर्शित होणार असल्याची चर्चा आहे. (सौजन्य: भाग्यश्री न्हालवे फेसबुक पेज) (सौजन्य: भाग्यश्री न्हालवे फेसबुक पेज) पारंपारिक लूकमध्ये सुंदर दिसणारी भाग्यश्री वेस्टर्न आऊटफिटमध्येही मस्त दिसते. (सौजन्य: भाग्यश्री न्हालवे फेसबुक पेज)

‘एचएसआरपी’ नंबर पाटीबाबत मोठी बातमी… राज्यात ३० टक्केच वाहनांना पाट्या लागल्या… १५ ऑगस्टनंतर…