Sonam Kapoor Trolled: आदित्य रॉय कपूर आणि दिशा पटानी यांची मुख्य भूमिका असलेला मलंग चित्रपट सात फेब्रुवारीला प्रदर्शित झाला. चित्रपटात अनिल कपूरही मुख्य भुमिकेत आहेत. ६ फेब्रुवारीला चित्रपटाचं स्पेशल स्क्रिनिंग आयोजित करण्यात आलं होतं. स्क्रिनिंगसाठी बॉलिवूडचे अनेक सेलिब्रेटी उपस्थित होते. यावेळी सोनम कपूर आपले वडील अनिल कपूर यांच्यासोबत स्क्रिनिंगसाठी पोहोचली होती. सोनम कपूरने अनिल कपूर यांच्यासोबत फोटोसाटी पोझ दिली होती. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंवरुन सोनम कपूरला ट्रोल केलं जात आहे. -
काही लोकांना सोनम कपूरचा बोल्ड ड्रेस आवडलेला नाही. वडिलांसमोर असे कपडे कोण घालतं असा प्रश्न काहीजण विचारत आहेत.
-
वडिलांसमोर असे कपडे घालताना लाज वाटली पाहिजे असंही काही ट्रोल करणाऱ्यांनी म्हटलं आहे.
-
अनिल कपूर आणि सोनम कपूर यांच्या फोटोवर अनेकांनी आक्षेपार्ह कमेंट केल्या आहेत.
सोनम कपूरने मात्र ट्रोल करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करणं पसंत केलं आहे. सोनम कपूर नेहमीच आपल्या बिनधास्त आणि बेधडक स्वभावासाठी ओळखली जाते. याआधी अनेकदा तिने ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. मोहित सुरी याने मलंग चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून कुणाल खेमूही चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. -
चित्रपटाला प्रेक्षकांचा थंड प्रतिसाद मिळत आहे.
चित्रपट समीक्षकांनीही चित्रपटावर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.

शेतकऱ्यांनो सावधान! एकाच वेळी समोर आली ५२ अतिविषारी घोणस जातीची पिल्ले; शेतकऱ्यानं काय केलं पाहा; VIDEO पाहून धक्का बसेल