-
आज बॉलिवूडमध्ये अशाही अभिनेत्री आहेत ज्यांनी आपल्या वयाची चाळीशी ओलांडली आहे. पण त्या आजही सौदर्य आणि फिटनेसच्या बाबतीत तरुणींना लाजवतील अशाच आहे. फिटनेस, ग्लॅमर, स्टाईल या सर्वच बाबतीत त्या नव्या अभिनेत्रींनाही टक्कर देतात. (फोटो – इंडियन एक्स्प्रेस)
-
शिल्पा शेट्टीचं वय ४५ वर्षे आहे. तिची दोन मुलंही आहे. परंतु तिनं ज्या प्रकारे स्वत:ला फिट आणि ग्लॅमरस ठेवलं आहे ते स्तुती करण्यासारखं आहे.
-
शिल्पा शेट्टी ही आपल्या फिटनेसवर खुप लक्ष देते. तसंच इतरांना फिट राहण्याचा सल्लाही ती देत असते. तिला योग करतानाही आपण अनेकदा पाहिलं आहे.
-
मलायका अरोरानं आपल्या वयाची ४६ वर्षे पूर्ण केली आहेत. ती फिटनेसच्या बाबतीत खुप जागरुक आहे.
-
मलायका रोज बराच वेळ जिममध्येही घालवते. तिच्या फिटनेसवरून तिची मेहनत दिसून येते. फॅशन आणि स्टाईलच्या बाबतीत मलायका डीवा मानली जाते.
-
माजी मिस वर्ल्ड आणि बॉलिवूडची अभिनेत्री ऐश्वर्या राय हिनेदेखील आपल्या वयाची ४६ वर्षे पूर्ण केली आहे. परंतु तिच्या फिटनेसवरून तिचं वय दिसून येत नाही.
-
ऐश्वर्या रायनं अभिषेक बच्चनशी लग्नगाठ बांधली आहे. त्यांची एक मुलगीदेखील आहे. ९० दशकातला ऐश्वर्याचा जलवा आजही कायम आहे.
-
रविना टंडन एकेकाळी सुपरस्टार अॅक्ट्रेस म्हणून ओळखली जात होती. तिनं आतापर्यंत असंख्य चित्रपटात आपल्या अभिनयानं सर्वांना भुरळ पाडली आहे.
-
रविना टंडनला दोन मुलं आहे. तिनं आपल्या वयाची ४५ वर्षे पूर्ण केली आहेत. परंतु तिच्या फिटनेसमुळे आजही तिचं वय दिसून येत नाही.
-
सुष्मिता सेन हिचे आजही अनेक चाहते आहे. सौदर्यासोबतच तिनं आपल्या फिटनेसवरही भर दिला आहे.
-
४४ वर्षीय सुष्मिता सेन आजही अनेकांची आवडती अभिनेत्री आहे.
-
लारा दत्तानं आजवर अनेक चित्रपटात अभिनय केला आहे. २०११ मध्ये टेनिसपटू महेश भूपतीसह तिनं लग्नगाठ बांधली होती.
-
लारा दत्ता आणि महेश भूपती यांची एक मुलगीही आहे. फिटनेसच्या बाबतीत ती आजही तितकीच जागरूक आहे. नुकतीच ती एका वेब सिरिजमध्येही झळकली होती.
-
करीना कपूरनं आपल्या वयाची चाळीशी पूर्ण केली आहे. तिनं काही वर्षांपूर्वी सैफ अली खान याच्याशी विवाह केला होता.
-
सैफ आणि करीनाचा एक मुलगाही आहे. तैमुरच्या जन्मानंतर तिच वजन वाढलं होतं. परंतु व्यायामाच्या जोरावर तिनं आपला जुना फिटनेस पुन्हा मिळवला आहे.

कोजागिरी पौर्णिमेला कोणत्या राशींच्या नशिबात येणार सुख-संपत्ती? वाचा मेष ते मीनचे सोमवारचे राशिभविष्य