-
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींची नावे घेतली तर सध्याच्या घडीला दीपिका पहिल्या क्रमांकावर आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पहिल्या चित्रपटापासूनच दीपिकाला प्रेक्षकांनी पसंती दिली आहे. दीपिका कुठेही गेली तर तिची एक झलक पाहण्यासाठी चाहते गर्दी करत असतात. अशावेळी तिच्या सुरक्षेची जबाबदारी ज्याच्यावर असते तो म्हणजे तिचा बॉडीगार्ड जलाल.
-
जलालचा जन्म महाराष्ट्रात झाला असून इथेच तो लहानाचा मोठा झाला.
-
गेल्या अनेक वर्षांपासून जलाल दीपिकासोबत काम करत आहे.
-
आपली सुरक्षा करत असल्याने दीपिका जलालला आपला भाऊ मानते. इतकंच नाही तर राखीदेखील बांधते.
-
दीपिका कुठे प्रवास करत असो अथवा कुठे कार्यक्रमाला जाणार असो…जलाल तिथे नेहमी उपस्थित असतो.
-
दीपिका आणि रणवीरचं इटलीत लग्न झालं तेव्हाही जलाल तिथे उपस्थित होता.
-
आपल्या या मानलेल्या भावाला दीपिका किती पगार देते हे ऐकून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल.
-
मीडिया रिपोर्ट्सनुसार, दीपिका जलालला वर्षाचा ८० लाख रुपये पगार देते. हा आकडा २०१७ मधील आहे. हा आकडा आता १ कोटीपर्यंत पोहोचला असेल असं बोललं जात आहे.
-
दीपिकाच्या अनेक सेल्फींमध्येही जलाल दिसत असतो.
-
कॉमेडी नाईट्स विथ कपिलमध्येही कपिल शर्माने जलालला स्टेजवर बोलावून त्याच्याशी गप्पा मारल्या होत्या
-
दरम्यान दीपिकाच्या चित्रपटांबद्दल बोलायचं गेल्यास लवरकरच ती रणवीर सिंगसोबत ८३ चित्रपटात दिसणार आहे. कबीर खानने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. रणवीर सिंग चित्रपटात कपिल देवच्या भूमिकेत दिसणार आहे. तर दीपिका ऑनस्क्रीनवरही रणवीरच्या पत्नीच्या भूमिकेत आहे.
-
हा चित्रपट एप्रिलमध्ये रिलीज होणार होता. पण करोनामुळे चित्रपटाचं प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलं आहे.

नकाशावरून पुसून टाकण्याच्या धमकीला पाकिस्तानचं उत्तर; म्हणाले, “भारतात घुसून…”