-
एकेकाळी मालिकांद्वारे आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांना भूरळ पाडणाऱ्या अनेक तारका होत्या. त्यांचा फॅन फॉलोईंगदेखील मोठा होता. परंतु आता त्या छोट्या पडद्यावरून गायब झाल्या आहेत. तसंच काही आपल्या कुटुंबासोबत व्यस्त झाल्या आहेत. तर काही अभिनंत्री परदेशात स्थायिक झाल्या आहेत. जाणून घेऊ अशाच काही अभिनेत्रींबाबत. ( सर्व फोटो – ट्विटर, फेसबुक)
-
अभिनेत्री मिहिका वर्मा हिनं ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेत मिहिकाची भूमिका साकारली होती. तिची भूमिका सर्वांच्या पसंतीसही उतरली होती. परंतु विवाहानतर तिनं अभिनयाला रामराम ठोकला. सध्या ती अमेरिकेत आपल्या पतीसोबत वास्तव्यास आहे.
-
कायम चर्चेत राहणाऱ्या श्वेता साळवे हिनंदेखील अभिनय क्षेत्राला रामराम ठोकला आहे. ते आता गोव्या आपल्या पतीसोबत एक रेस्त्राँ चालवते.
-
राजश्री ठाकूर हिनं सात फेरे या मालिकेत सलोनीची भूमिका साकारली होती. तिची ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. सध्या अभिनय क्षेत्र सोडून ती आपल्या कुटुंबासोबत व्यस्त आहे.
-
साथ निभाना साथीयासारख्या हिट मालिकेत अभिनय केलेल्या रूचा हसबनिस हीदेखील छोट्या पडद्यापासून दूर गेली आहे. सध्या ती आपल्या पतीसोबत परदेशात स्थायिक झाली आहे.
-
एकता कपूरची आवडती अभिनेत्री अशी ओळख असलेल्या पूनम नरूला हिनं २०१० मध्ये अभिनय क्षेत्राला रामराम ठोकला. आता वेडिंग प्लॅनर म्हणून काम करते.
-
अभिनेत्री नेहा बग्गा हिनंदेखील छोट्या पडद्यावरून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. सध्या ती टिक-टॉकवर फार फेमस आहे.
-
सौम्या सेठ ही अभिनेता गोविंदा याची भाची आहे. अनेक हिट मालिकांमधून अभिनय साकारल्यानंतर आता अभिनय क्षेत्र सोडून ती अमेरिकेत स्थायिक झाली आहे.
-
ये रिश्ता क्या कहलता है या मालिकेतून प्रकाशझोतात आलेल्या मोहेना कुमारी सिंह हिनं विवाहानंतर अभिनय क्षेत्राला रामराम ठोकला.
-
अंकिता भार्गव हिनं अनेक मालिकांमध्ये अभिनय साकारला आहे. तिनं अभिनेता करण पटेल याच्यासोबत विवाह केला आहे. लग्नानंतर तिनंही अभिनय क्षेत्राला रामराम ठोकला.

नकाशावरून पुसून टाकण्याच्या धमकीला पाकिस्तानचं उत्तर; म्हणाले, “भारतात घुसून…”