-
सुरुवातीच्या काळात टीव्ही हे माध्यम चित्रपटात काम करण्याचा मार्ग समजला जायचा. परंतु सध्याच्या काळात बॉलीवूड स्टार्स टीव्ही शो मध्ये काम करताना दिसतात. यात अगदी सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यापासून ते बॉलीवूडचा दबंग सलमान खान यांची नावं येतात. तर जाणून घेऊयात कोणता स्टार टीव्ही शोसाठी किती फी घेतो?
-
माधुरी दीक्षितने कलर्स टीव्हीच्या झलक दिखलाजा या शोमध्ये परीक्षक म्हणून काम केलं आहे. यासाठी माधुरीने १ कोटी रुपये इतकी फी घेतल्याचं म्हटलं जातं.
-
करीना कपूर झी टीव्ही वरील डान्स रिअलिटी शो डान्स इंडिया डान्स : बॅटल ऑफ द चॅम्पियन्स मध्ये परीक्षक म्हणून काम केलं आहे. यासाठी करीनाने ३ कोटी रुपये इतकी फी आकारली होती.
-
जॅकलीन फर्नांडीसने झलक दिखलाजा सीजन ९ या शोसाठी परीक्षक म्हणून ९ कोटी रुपये इतकी फी आकारली होती.
-
ह्रितिक रोशनने जस्ट डान्स या रिअलिटी शोमध्ये परीक्षक म्हणून काम केलं आहे. यासाठी ह्रितिकने १ कोटी रुपये इतकी फी घेतल्याचं म्हटलं जातं.
-
मलायका अरोराने कलर्स टीव्हीच्या इंडियास गॉट टॅलेंट या शोमध्ये परीक्षक म्हणून काम केलं आहे. यासाठी मलायकाने १ कोटी रुपये इतकी फी घेतल्याचं म्हटलं जातं.
-
शिल्पा शेट्टीने सोनी टीव्ही वरील सुपर डान्सर सीजन १ या शोमध्ये परीक्षक म्हणून काम केलं. यासाठी शिल्पाने १३ कोटी रुपये इतकी फी आकारली होती.
-
सलमान खानने बिग बॉस १३ साठी १३ कोटी रुपये तर बिग बॉस १२ साठी ११ कोटी रुपये इतकी फी घेतल्याचं म्हटलं जातं. (स्टार्सच्या ही फी इंटरनेटवर दिलेल्या माहितीवर आधारित आहे. लोकसत्ता डॉट कॉम या आकडेवारीची पुष्टी करत नाही)

नकाशावरून पुसून टाकण्याच्या धमकीला पाकिस्तानचं उत्तर; म्हणाले, “भारतात घुसून…”