-
मुंबईही स्वप्नांची नगरी आहे. इथे अनेकजण आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी येतात. त्यासाठी मेहनतही करतात. तसेच अशी अनेक नावे आहेत ज्यांना या मायानगरीने ओळख निर्माण करुन दिले. यामध्ये अमिताभ बच्चन यांच्यापासून ते उद्योपती अंबानींपर्यंत अनेकांचा समावेश आहे. जेवढी या श्रीमंत लोकांच्या नावाची चर्चा होते. तितकीच त्यांच्या लग्झरी लाईफचीही सुरु असते. मुंबईमध्ये अनेक आलिशान बंगले आहेत. चला जाणून घेऊया मुंबईमधील काही श्रीमंत व्यक्तींच्या बंगले आणि त्या बंगल्याच्या किंमती..
-
बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन राहत असलेल्या त्यांच्या बंगल्याचे नाव 'जलसा' आहे. हा बंगल्या एखाद्या राजमहालापेक्षा कमी नाही. या बंगल्याची किंमत १६० कोटी रुपये असल्याचे म्हटले जाते.
-
अमिताभ यांच्याकडे आणखी तिन बंगले आहेत. प्रतीक्षा, जनक आणि वत्सा. त्यातील प्रतीक्षा या मुंबईमधील बंगल्याची किंमत जवळपास ८० कोटी असल्याच्या चर्चा सुरु आहेत.
-
भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या घराचे नाव अँटीलिया आहे. त्यांचे हे घर २७ मजल्यांचे आहे. त्यांच्या या घराची किंमत जवळपास १० ते १२ हजार कोटी रुपये असल्याचे म्हटले जाते.
-
बॉलिवूडचा किंग खान शाहरुखच्या बंगल्याचे नाव 'मन्नत' आहे. चाहते शाहरुखला भेटण्यासाठी नेहमी त्याच्या बंगल्याबाहेर गर्दी करतात. त्याच्या या बंगल्याची किंमत जवळपास २०० कोी असल्याचे म्हटले जाते.
-
जॉन अब्राहमच्या 'विला इन द स्काय' या बंगल्याची किंमत जवळपास ७५ कोटी रुपये असल्याच्या चर्चा सुरु आहेत.
-
अक्षय कुमारच्या बंगल्याची किंमत ८० कोटी रुपये आहे.
-
अभिनेता सैफ अली खानने मुंबईमध्ये फॉर्च्यून हाइट्स अपार्टमेंटमध्ये घर घेतले आहे. या घरांची एकूण किंमत ४८ कोटी रुपये असल्याचे म्हटले जाते.
-
बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमधील घराची किंमत जवळपास ६० कोटी रुपये असल्याच्या चर्चा सुरु आहेत.
-
टाटा ग्रूपचे मालक रतन टाटा यांचा बंगलाही सर्वात महागड्या बंगल्यांच्या यादीमध्ये आहे. त्यांच्या बंगल्याची किंमत १२० ते १५० कोटी रुपये असल्याचे म्हटले जाते. त्यांचा हा बंगला कुलाबा परिसरात आहे.
-
येस बँकेचे सीइओ राणा कपूर हे देखील एक लोकप्रिय उद्योगपती आहेत. त्यांचा बंगला मुंबईमधील टोनी अल्टामाइंड रोड जवळ आहे. त्यांच्या या बंगल्याची किंमत जवळपास १२० कोटी असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
-
साउथ मुंबईमधील ब्रीच कँडी येथे सर्वात महागडी घरे पाहायला मिळतात. तेथे रेमंड ग्रूपचे मालक, उद्योगपती गौतम सिंघानिया यांचे घर आहे. त्यांच्या या घराची किंमतही कोट्यावधी रुपये आहे.
-
२०१६मध्ये अभिनेता रणबीर कपूरने मुंबईतील पाली हिल्स येथे बंगला खरेदी केला होता. त्याच्या बंगल्याचे नाव 'वास्तु' आहे. त्याची किंमत ३५ कोटी रुपये असल्याचे म्हटले जाते.
-
शाहिद कपूरने काही दिवसांपूर्वीच वरळीमध्ये एक घर खरेदी केले आहे. त्याच्या घराची किंमत ५६ कोटी रुपये असल्याचे म्हटले जाते.

नकाशावरून पुसून टाकण्याच्या धमकीला पाकिस्तानचं उत्तर; म्हणाले, “भारतात घुसून…”