-
एका चॉकलेटच्या जाहिरातीतून करिअरची सुरूवात करणाऱ्या अभिनेत्री दिशी पटानीचे आज लाखो चाहते आहेत.
-
अनेक चित्रपट, जाहीरातींमधून दिशाने बॉलिवूडमध्ये आपलं नाव प्रस्थापित केलं आहे. एका खासगी संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत दिशाने भारतीय क्रिकेटपटूंपैकी कोणता खेळाडू आपल्याला सर्वात जास्त हॉट वाटतो हे सांगितलं होतं.
-
दिशाने यावेळी खेळाडूंना त्यांच्या Hotness Quotient वरुन मार्क दिले होते. जाणून घेऊयात कोणता खेळाडू वाटतो दिशा पटानीला हॉट
दिशाच्या पहिल्याच चित्रपटात ऐनवेळी तिला नाकारून दुसऱ्या अभिनेत्रीला घेण्यात आलं. मात्र या नकाराकडेही तिने सकारात्मक दृष्टीकोनातून पाहिलं. "नकार तुम्हाला अधिक खंबीर बनवतो हे मला सुरुवातीलाच शिकायला मिळालं. ज्या कारणासाठी तुम्हाला नकार मिळतो, तेव्हा त्यासाठी तुम्ही अधिक मेहनत घेता," असं ती एका मुलाखतीत म्हणाली. -
अभिनेत्री होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिशाने अर्ध्यावरच शिक्षण सोडलं.
शिक्षण अर्धवट सोडून ती मुंबईला आली. कोणत्याही ओळखीशिवाय एका नवीन शहरात येऊन राहणं काही सोपी गोष्ट नाही. -
"मी एकटीच राहत होती आणि स्वत:च्या खर्चासाठी कधीच कुटुंबीयांकडे पैसे मागितले नाही. फक्त ५०० रुपये घेऊन मी मुंबईत आली होती आणि एक वेळ अशी आली की जेव्हा माझ्याकडे अजिबात पैसे नव्हते", असं तिने सांगितलं.
जाहिराती आणि चित्रपटांच्या ऑडिशन्ससाठी दिशाने खूप पायपीट केली. काम मिळालं नाही तर घरभाडं कसं देऊ याचा सतत ताण तिच्यावर होता. -
बॉलिवूडची सध्या आघाडीची अभिनेत्री दिशा पटानीचा आज वाढदिवस आहे.

नकाशावरून पुसून टाकण्याच्या धमकीला पाकिस्तानचं उत्तर; म्हणाले, “भारतात घुसून…”