-
तुम्हाला झाडं झुडपं आणि निसर्ग सौंदर्यामध्ये राहणं पसंत असेल तर अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांच घर सर्वात जास्त आवडेल. ( सर्व फोटो सौजन्य – ट्विंकल खन्ना इन्स्टाग्राम)
-
मुंबईत जुहू येथे समुद्रकिनारी हा बंगला असून, तुम्ही पाहताक्षणी या वास्तुच्या प्रेमात पडता.
-
हिरवागार बगीचा, बोगनवेलची फुले, डबकं, खिडक्यांभोवती आच्छादलेली केळीची पान आणि घराच्या आता केलेलं सुबक इंटिरिअर मन मोहून टाकतं.
-
अक्षय-ट्विंकलचे हे घर जुहूमध्ये असून त्यांना हृतिक रोशनचा शेजार लाभला आहे.
-
"समुद्र किनारी राहणे एक सुंदर अनुभव आहे. इथे बसून सूर्यास्त पाहणे खूप मनाला सुखावणारा, समाधान देणारा अनुभव असतो" असे ट्विंकलने वॉग्युला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते.
-
ट्विंकल स्वत: लेखिका असून तिला पुस्तके वाचायला, लिहायला मुलीसोबत वेळ घालवायला आवडते.
-
ट्विंकल सोशल मीडियावर तिच्या घराचे फोटो शेअर करत असते. हे फोटो पाहिल्यानंतर अक्षय-ट्विंकल किती भाग्यवान आहेत असेच त्यांचे चाहते म्हणत असतील.
-
या आलिशान ड्युप्लेक्स बंगल्यामध्ये किचन, डायनिंग एरीया सर्व एैसपैस आहे.
-
पहिल्या मजल्यावर अक्षय कुमारचे कपाट आहे. दुसऱ्या मजल्यावर बेडरुम आणि ट्विंकलचा स्टडी रुम आहे.
-
बंगल्याच्या भोवतालचा परिसर हिरव्यागार बगिच्याने नटलेला आहे.
-
बंगल्याच्या आत सुंदर डबकं असून त्यात मासे सुद्धा आहेत.
-
बंगल्याच्या आतमध्येच नाही बगिच्याचा परिसरही ट्विंकलने पुतळे आणि अन्य शिल्पकलेच्या वस्तुंनी सजवला आहे.
-
प्रत्येक कोपरा आणि दरवाजाजवळचा भाग सुंदर पुतळयांनी सजवला आहे.
-
ट्विंकलला पुस्तकांची प्रचंड आवड आहे. ती नेहमी पुस्तकांमध्येच असते. स्टडीरुम तिची पुस्तकांनी भरलेली आहे.
-
अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना हे बॉलिवूडमधल्या यशस्वी जोडप्यांपैकी एक आहे. लग्नानंतर दोघांचा सुखाचा संसार सुरु आहे.

नकाशावरून पुसून टाकण्याच्या धमकीला पाकिस्तानचं उत्तर; म्हणाले, “भारतात घुसून…”