-
जर तुम्ही सोशल मीडियाचा वापर करत असाल तर तुम्हाला कॅरी मिनाटी हे नाव नक्कीच परिचयाचं असेल. गेल्या काही दिवसांपासून कॅरी मिनाटी उर्फ अजय नागर हा सोशल मीडियावरील चर्चेचा विषय बनला आहे. (सर्व फोटो – इन्स्टाग्राम)
-
त्याच्या Youtube vs Tiktok: The End या व्हिडीओमुळे तो चर्चेचा विषय ठरत आहे. व्हिडीओमध्ये त्यानं टिकटॉक स्टार आमिर सिद्दीकीला रोस्ट केलं होतं.
-
सोशल मीडियावर त्याचा हा व्हिडीओ इतक्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला की त्यानं सर्ल रेकॉर्ड तोडले. असं असलं तरी त्यानं याद्वारे एक वादही ओढवून घेतला.
-
परंतु भारतातून त्याच्या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात लाईक्स मिळायला लागले. नुकताच १२ जून रोजी त्यानं वयाची २१ वर्षे पूर्ण केली.
-
कॅरी मिनाटी हा वयाच्या दहाव्या वर्षापासूनच युट्यूबवर अॅक्टिव्ह आहे. लहान असताना त्याला अभ्यासात रस नसल्यानं तो आपला अधिकांश वेळ हा युट्यूबवरच घालवत होता.
-
११ व्या वर्षी त्यानं आपला स्टील द फिअर्स नावाचा एक युट्यूब चॅनल सुरू केला. परंतु त्याला सुरूवातीला चांगला रिस्पॉन्स मिळाला नाही.
-
त्यानंतर त्यानं अॅडिक्टेड ए १ नावाचा युट्यूब चॅनल सुरू केला. त्यावर त्यानं बॉलिवूडमधल्या मोठ्या कलाकारांची मिमिक्री करण्यास सुरूवात केली.
-
त्यानंतर काही काळानं त्यानं त्या चॅनलचं नाव बदलून कॅरी देओल असं केले. परंतु युट्यूबर भूवन बामला ज्यावेळी त्यानं रोस्ट केलं तेव्हा तो अधिक चर्चेत आला. त्यानंतर त्याचे फॉलोअर्स मोठ्या प्रमाणात वाढले.
-
या ठिकाणी वाढते सबस्क्रायबर्स पाहून त्यानं युट्यूबलाच आपलं प्रोफेशन बनवलं. त्यानंतर त्यानं आपल्या चॅनलचं नाव पुन्हा बदलून कॅरी मिनाटी असं केलं. फेस कॅमच्या माध्यमातून तो लोकांचं मनोरंजन करू लागला.
-
आतापर्यंत त्याला अनेकांकडू धमक्या मिळाल्याचीही माहिती समोर आली आहे. अनेकदा तर त्याचा चॅनल बंद होताहोताही वाचला आहे.
-
पहिल्यांदा तो लोकांचं मनोरंजन करण्यासाठी मिमिक्री करू रोस्ट करत होता. परंतु आता कोणालाही रोस्ट करण्यापूर्वी तो त्याची परवानगीही घेतो.
-
याव्यतिरिक्त त्याला ऑनलाइन गेमिंगचीही आवड आहे. यासाठी त्यानं आपल्या कॅरी इज लाइव्ह नावाचा एक नवा चॅनलही सुरू केला आहे.
-
या चॅनलवर तो रोज २ ते ३ तास लाइव्ह गेम स्ट्रिमिंग करतो. तसंच सबस्क्रायबर्ससोबत चीट चॅटही करतो.
-
त्यानं नुकसतंच महेंद्र सिंग धोनीलाही पबजी खेळण्यासाठी चॅलेंज दिलं आहे. आपल्याला त्याच्यासोबत पबजी खेळायचा असल्याचं तो म्हणतो.
-
त्याला पबजीची आवड असून तो गेल्या काही वर्षांपासून हा गेम खेळत आहे. तसंच तो रॉयल गेम असल्याचंही तो म्हणतो.
-
एका परिचयाच्या मॅगझीननं त्याला आपल्या नेक्स्ट जेन लीडर्स २०१९ च्या यादीतही स्थान दिलं होतं.
-
कॅरी हरियाणातील फरीदाबादचा रहिवासी आहे.
-
तो आपल्या भाऊ जय नागर याच्यासोबतही मिमिक्री करतो. व्हिली फेन्झी नावानं तो युट्यूबवर प्रसिद्ध आहे.
-
आजपर्यंत कॅरी हा अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. काही वेळा त्याला व्हिडीओदेखील काढून टाकावा लागला आहे.
-
इंटरनेटवर असलेल्या माहितीनुसार आणि काही माध्यमांच्या रिपोर्टनुसार तो वर्षाला दोन कोटी रूपये कमवतो. तसंच तो १० कोटींचा मालकही असल्याचं म्हटलं जातं. परंतु या वृत्ताला दुजोरा मिळालेला नाही.
-
त्याच्या कुटुंबीयांबद्दल अधिक माहिती उपलब्ध नाही. तरी ते फरीदाबादमधील एका कंपनीत मॅनेजर म्हणून कार्यरत असल्याचं म्हटलं जातं.
-
तो आपल्या भावाला आपला आदर्श मानतो आणि तो त्याच्या खुप जवळही आहे.

नकाशावरून पुसून टाकण्याच्या धमकीला पाकिस्तानचं उत्तर; म्हणाले, “भारतात घुसून…”