सर्वाधिक चर्चेत असलेली जोडी विराट कोहली व अनुष्का शर्माने २०१६ मध्ये मुंबईतील वरळी परिसरात घर विकत घेतलं. याच नव्या घरात विराट-अनुष्काने लग्नानंतर संसार थाटला. ‘ओमकार रिटेलर्स अॅण्ड डेव्हलपर्स रेसिडेन्शिअल प्रोजेक्ट’ अंतर्गत वरळी येथे साकारण्यात आलेल्या ‘ओमकार १९७३’ या टॉवरमध्ये ३५ व्या मजल्यावर त्यांचा हा आशियाना आहे. ५ बीएचके, ‘सी फेसिंग व्ह्यू’ असणाऱ्या ७,१७१ चौरस फुटांच्या घरात ते राहत आहेत. १३ फूट उंचीची प्रत्येक खोली असणाऱ्या या घरातून संपूर्ण शहराची सुरेख झलकही दिसते. इकॉनॉमिक टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार कोहलीच्या या अलिशान घराची किंमत सुमारे ३४ कोटी रुपये इतकी आहे. -
विराट-अनुष्काचं हे घर हिरवाईने नटलेलं आहे.
-
नेहमी व्यग्र वेळापत्रकामुळे एकमेकांना पुरेसा वेळ देऊ न शकणारे विराट-अनुष्का सध्या लॉकडाउनमध्ये एकमेकांसोबत मनसोक्त वेळ घालवत आहेत.
-
छायाचित्र सौजन्य : इन्स्टाग्राम/ अनुष्का शर्मा
-
छायाचित्र सौजन्य : इन्स्टाग्राम/ अनुष्का शर्मा

नकाशावरून पुसून टाकण्याच्या धमकीला पाकिस्तानचं उत्तर; म्हणाले, “भारतात घुसून…”