-
अभिनेता सुशांत सिंह राजपूत यान रविवारी (१४ जून) मुंबईत आत्महत्या केली. वांद्रे परिसरातील राहत्या घरात गळफास घेऊन त्यानं जीवन संपवलं. सुशांतच्या मृत्यूची बातमी वादळासारखी सगळीकडे काही वेळात पसरली. सुशांतच्या अशा एकाएकी जाण्यानं अनेकांना धक्का बसला. (सर्व फोटो : सुशांत सिंह राजपूत/ट्विटर हॅण्डल)
-
“सुशांत सिंग राजपूत… एका अतिशय प्रतिभावान, उमद्या आणि तरूण अभिनेत्याने खूप लवकर जगाचा निरोप घेतला. टिव्ही मालिका आणि चित्रपटांतील त्याचा अभिनय खूप चांगला होता. मनोरंजन जगतात त्याने स्वत:च्या परिश्रमाने नाव मिळवलं. तो खूप जणांसाठी प्रेरणास्थान होता. तो अनेक आठवणी मागे ठेऊन गेला आहे. त्याच्या मृत्यूच्या वृत्ताने मला धक्का बसला आहे. मी त्याच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे. ओम शांती” -नरेंद्र मोदी, पंतप्रधान
-
“सुशांत सिंह राजपूत यांच्या अचानक निधनाची बातमी धक्कादायक आणि क्लेशदायक आहे. ईश्वर त्यांच्या कुटुंबियांना, चाहत्यांना आणि जवळच्या व्यक्तींना बळ देवो.” -उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री
-
“तू गेल्याचं कळल्यानंतर स्तब्ध झालोय. गेल्या आठवड्यातच तुला फोन करायचा विचार केला होता…वेळ कसा घालवतोय यावर गप्पा मारु…थोडी मजा-मस्ती करु…असा विचार केला होता. इतका उशीर नाही झाला ना भावा की तू कायमचा शांत झाला….? तुम गए क्या शहर सूना कर गए, दर्द का आकार दूना कर गए..!”अशी प्रतिक्रिया कुमार विश्वास यांनी दिली आहे. हिंदीमध्ये ट्विट करत विश्वास यांनी, “स्तब्ध हूँ ! पिछले हफ़्ते यूँ ही अचानक सोचा था कि तुम्हें कॉल करूँगा,बात करूँगा,ख़ाली वक़्त कैसे कट रहा है इस पर बात करेंगे, हंसी-मज़ाक़ करेंगे ! इतना लेट तो नहीं हुआ भाई कि तुम ऐसे ख़ामोश हो गए ? उफ़ “तुम गए क्या शहर सूना कर गए, दर्द का आकार दूना कर गए..!” -कुमार विश्वास, कवी
-
पूछा न जिंदगी में, किसी ने भी दिल का हाल.. अब शहर भर में ज़िक्र, मेरी खुदकुशी का है। -खासदार संजय राऊत, शिवसेना नेते
-
“२०२० साल थांबायचं नावच घेत नाहीये! एकामागून एक भयंकर घटना चालूच आहेत! सुशांत सिंग रजपूतची बातमी प्रचंड धक्कादायक आहे.” -समीर विद्धांस, दिग्दर्शक
-
"तो माझ्या पटना शहरातून होता. त्याला मी राष्ट्रपती भवनामध्ये शपथविधीच्या कार्यक्रमादरम्यान भेटलो होतो. त्याने त्याचे कुटुंब पटनामधील राजीव नगर येथे राहत असल्याचं मला सांगितलं होतं. त्याच्या समोर अजून बरचं आय़ुष्य होतं. खूप लवकर गेला." -रवि शंकर प्रसाद, केंद्रीय मंत्री
-
"तो इतकं चांगलं काम करत होता. त्याने असं का केलं असावं." -संबित पात्रा, भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते
-
"त्याच्याकडे अजून बरचं आयुष्य शिल्लक होतं. गप्पा मारण्यासाठी अगदी छान व्यक्ती होता. त्याचं अशा पद्धतीने जाणं मनाला चटका लावणारं आहे." -राज्यवर्धन सिंग राठोड
-
"तो तरुण आणि मल्टी टॅलेण्टेड होता. आपण मानसिक आरोग्याची आपण सर्वांनीच काळजी घेतली पाहिजे." -पियुष गोयल, रेल्वेमंत्री
-
"सुशांतच्या आत्महत्येची बातमी मन सून्न करणारी आहे. या बातमीमुळे धक्का बसला. मी काय बोलू? शब्दच फुटत नाहीत. मला आठवतंय सुशांतचा छिछोरे सिनेमा पाहिला आणि माझा मित्र साजिद याला फोन करुन सांगितलं की मला हा सिनेमा पाहताना किती मजा आली. मी देखील या सिनेमात असतो तर मजा आली असती. एका गुणी अभिनेत्याचा शेवट झाला. त्याच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो." -अभिनेता अक्षय कुमार
-
-
“माझा यावर विश्वासच बस नाही. हे खरं नाही.” हिना खान, अभिनेत्री
-
“ही अतिशय आश्चर्यकारक घटना आहे. ही अतिशय दु:खद घटना आहे. का? एवढ्या चांगल्या आणि तरूण आयुष्याला तू का संपवलंस.” -अफताब शिवदासनी
-
“त्यानं स्वत:चं जीवन संपवलं या गोष्टीला मी नाकारत आहे. हा तो सुशांत असूच शकत नाही.” -मीरा राजपूत
-
“सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूच्या बातमीने मला धक्का बसला आहे. बराच वेळ त्याला भेटलो होतो. माहीच्या जीवनावर चित्रपट बनवत असताना त्याने बराच वेळ आमच्यासोबत घालवला होता. आपण हॅण्डसम, सदा हसतमुख राहणारा एक अभिनेता गमावला आहे”-सुरेश रैना, क्रिकेटपटू

कोजागिरी पौर्णिमेला कोणत्या राशींच्या नशिबात येणार सुख-संपत्ती? वाचा मेष ते मीनचे सोमवारचे राशिभविष्य