-
गायिका ते अभिनेत्री असा प्रवास करणाऱ्या आर्या आंबेकरचा आज वाढदिवस आहे. झी मराठीवर २००८ मध्ये रंगलेल्या ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या रिअॅलिटी शोने आर्या आंबेकरला ओळख मिळवून दिली. (सर्व फोटो सौजन्य – आर्या आंबेकर इन्स्टाग्राम)
-
मूळची नागपूरची असलेली आर्या गायनामध्ये यशस्वी झाल्यानंतर तिने अभिनयातही नशीब आजमावले.
-
आर्या जरी गायनात हुषार असली तरी भविष्यात ती अभिनेत्री होणार याची चुणूक ‘सारेगमप लिटील चॅम्प्स’मध्येच पाहायला मिळाली होती.
-
छोट्या पडद्यावर गाजलेल्या ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेचं शीर्षक गीतही आर्यानेच गायलं आहे.
-
आर्याचा जन्म नागपूरमध्ये समीर आणि श्रुती आंबेकर या मराठी दांपत्याच्या घरी झाला. आर्याचे वडील समीर हे डॉक्टर असून आई श्रुती गायिका आहे. आर्याने आपल्या आईकडून गायनाचे धडे घेतले.
-
आर्याची आजीसुद्धा एक शास्त्रीय गायिका आहे. तिने आर्या जेमतेम २ वर्षाची असतानाच तिचे गायनातले कौशल्य ओळखले.
-
आर्या साडेपाच वर्षाची असताना तिने आपल्या आईकडे शास्त्रीय गायनाचे धडे गिरवण्यास सुरुवात केली. वयाच्या सहाव्या वर्षी तिने संगीताची पहिली परीक्षा दिली.
-
२०१७ च्या सुरवातीस प्रदर्शित झालेल्या 'ती सध्या काय करते' या चित्रपटातून तिने अभिनय कारकीर्दीस सुरुवात केली.
-
'ती सध्या काय करते' या चित्रपटातील तिची भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.
-
तिसरीत असताना आर्याने आंतरशालेय गायनाच्या स्पर्धेत भाग घेतला आणि आपल्या शाळेला पहिले पारितोषिक मिळवून दिले.
-
आर्याने आतापर्यंत अनेक मराठी / हिंदी भाषा अल्बम्स तसेच काही मराठी चित्रपटांसाठी व नाटकांसाठी गाणी गायली आहेत.
-
लेटस गो बॅक, बालगंधर्व, रमा माधव तसेच आणखी काही चित्रपटांसाठी आर्याने पार्श्वगायन केले आहे.
-
सुवासीनी, दिल दोस्ती दुनियादारी, तुला पाहते रे, जिवलगा या मालिकांसाठी आर्याने गाणी गायली आहेत.
-
माणिक वर्मा शिष्यवृत्ती, डॉ. वसंतराव देशपांडे पुरस्कार, मोस्ट नॅचरल परफॉरमन्स ऑफ द इअर, सूर ज्योत्सना राष्ट्रीय संगीत अशा मानाच्या पुरस्काराने आर्याला सन्मानित करण्यात आले आहे.
-
आर्या आज यशस्वी गायिका आणि अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

“अरे जरा तरी लाज ठेवा” दादरच्या शिवाजी पार्कवर भर दिवसा किळसवाणं कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल प्रचंड राग