‘सुखांच्या सरींनी हे मन बावरे’ या लोकप्रिय मालिकेत ‘संयोगिता’ हे पात्र रंगविणारी व ‘बिग बॉस मराठी’ या रिअॅलिटी शोमुळे चर्चेत आलेली अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत. (सर्व फोटो : शर्मिष्ठा राऊत/ इंस्टाग्राम) -
अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतचा नुकताच साखरपुडा पार पडला.
-
तेजस देसाई असं शर्मिष्ठाच्या जोडीदाराचं नाव आहे.
-
इगतपुरी येथे मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
-
एप्रिल महिन्यात शर्मिष्ठाचा साखरपुडा पार पडणार होता. मात्र लॉकडाउनमुळे ते शक्य झालं नव्हतं.
-
आता लॉकडाउनचे काही नियम शिथिल केल्याने साखरपुड्यासाठी हीच वेळ योग्य ठरू शकते, असा विचार करत दोघांनी २१ जून ही तारीख निश्चित केली.
-
इगतपुरीमधल्या रिसॉर्टच्या क्लबहाऊसमध्ये हा साखरपुडा पार पडला असून त्याला केवळ ३५ जण उपस्थित होते.
-
या साखरपुड्याला उपस्थित राहणाऱ्या सर्वांच्या आरोग्याची योग्य ती काळजी घेण्यात आल्याचं तिने सांगितलं.
-
सॅनिटायझर, मास्क, ग्लोव्ह्स या सर्वांची व्यवस्था तिथे करण्यात आली होती.
-
येत्या ऑक्टोबर महिन्यात शर्मिष्ठा व तेजस लग्न करणार असल्याचं कळतंय. मात्र तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. शर्मिष्ठाचं हे दुसरं लग्न असेल.

Kitchen jugad video: फ्रिजमध्ये कापूस ठेवताच कमाल झाली; पहिल्याच महिन्यात अर्ध्यापेक्षा कमी येईल वीज बिल