छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'तुझ्यात जीव रंगला'चं शूटिंग लवकरच सुरू होणार आहे. या मालिकेतील कलाकार चित्रीकरणासाठी कोल्हापूरमध्ये दाखल झाले आहेत. तिथे त्यांची करोना चाचणी देखील घेण्यात आली. -
या सर्व मंडळींचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहे.
-
तरीही खबरदारी म्हणून त्यांना सात दिवसांसाठी एका हॉटेलमध्ये क्वॉरंटाईन करण्यात आलं आहे.
-
सेटवरही पूर्वतयारीला सुरुवात झाली आहे.
-
संपूर्ण सेट सॅनिटाइज करण्यात आला आहे.
-
शूटिंगचे सर्व नियम मालिकेच्या टीमकडून पाळण्यात येत आहेत.
-
सेटवरील प्रत्येक कोपरा काळजीपूर्वक सॅनिटाइज करण्यात आला आहे.
-
करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे चित्रपट, मालिका आणि जाहिरातींचे चित्रीकरण बंद करण्यात आले होते. या निर्बंधांमुळे दररोज लाखो रुपयांचे नुकसान होत होते.
-
या आर्थिक नुकसानातून बाहेर येण्यासाठी सरकारने पुन्हा एकदा चित्रीकरण सुरु करण्याची परवानगी दिली.

महिलांनो, फ्रिजमध्ये एकदा नक्की ठेवा मिठाने भरलेली वाटी; तुमची पावसाळ्यातील ‘ही’ मोठी समस्या होईल कायमची दूर, पाहा कमाल