-
माणसाचं वाढतं वय हे त्याच्या चेहऱ्यावरुन स्पष्ट दिसतं. पण याला अपवाद आहेत ते अभिनेते अनिल कपूर. वयाची साठी ओलांडल्यानंतर आजही अनिल कपूर तितकेच तरुण दिसतात. ( सर्व फोटो सौजन्य – अनिल कपूर इन्स्टाग्राम)
-
२४ डिसेंबर १९५६ रोजी अनिल कपूर यांचा एका पंजाबी कुटुंबात जन्म झाला. त्यांचे वडील सुरींदर कपूर प्रसिद्ध निर्माते होते. १९७९-८० च्या दशकात बॅकग्राऊंड डान्सर म्हणून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली
-
'वो सात दिन' चित्रपटातून अनिल कपूर यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २३ जून १९८३ रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्याआधी अनिल कपूर यांनी काही हिंदी, तेलगु आणि कन्नड चित्रपटात छोटया-छोटया भूमिका केल्या.
-
'मी माझा अभिनयाचा कोर्स पूर्ण केला. पण मला काम मिळत नव्हते. त्यावेळी एक शो परदेशात चाललेला. झरीना वहाब, पद्ममिनी कपिला, हेमंत कुमार आणि नूतन हे कलाकारा त्या शो मध्ये होते'
-
'त्यावेळी त्यांना काही बॅकग्राऊंड डान्सर्सची आवश्यकता होती. त्यामुळे बॅकग्राऊंड डान्सर म्हणून मी तिथे गेलो. त्यावेळी एका शो चे मला दिवसाला १५ पाऊंड मिळायचे' असे अनिल कपूर यांनी आपल्या स्ट्रगलच्या दिवसाबद्दल मिड डे शी बोलताना सांगितले.
-
दृढनिश्चय आणि शिस्त यामुळे चित्रपट सृष्टीत दीर्घकाळ पाय रोवून राहणे शक्य झाले असे अनिल कपूर मानतात. भारतीय सिनेमाचा आज्ञाधारक विद्यार्थी असे अनिल कपूर स्वत:चे वर्णन करतात.
-
नशीब, दिग्दर्शक आणि कुटुंब यामुळे तीन दशकानंतरही चित्रपट सृष्टीत टिकाव धरुन राहणे शक्य झाले असे अनिल कपूर सांगतात.
-
योग्य वेळ, योग्य कथानक आणि दिग्दर्शक मला लाभले आणि मी योग्य निवड केली. त्याशिवाय कुटुंब सुद्धा आपले बलस्थान असल्याचे अनिल कपूर सांगतात.
-
अनिल कपूर यांनी वयाच्या १४ व्या वर्षी पहिल्यांदा रुपेरी पडद्यावर अभिनय केला. 'तू पायल में गीत' या चित्रपटात त्यांनी बालकलाकाराची भूमिका केली.
-
अनिल कपूर यांनी पुण्याच्या एफटीआयआय संस्थेत प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना अपयश आले होते. ते थोडे निराशही झाले होते.
-
पण अनिल कपूर यातून सावरले व त्यांनी रोशन तनेजा यांच्या अभिनय शाळेत प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला.
-
वामसा वृक्षम या तेलगु तसेच मणिरत्नम यांच्या पल्लवी अनु पल्लवी या दक्षिणेकडच्या चित्रपटातही अनिल कपूर यांनी काम केले.
-
बॉलिवूडमध्ये माधुरी दिक्षित बरोबर त्यांची जोडी विशेष गाजली. ९० च्या दशकात या जोडीने अनेक हिट चित्रपट दिले.
-
तेजाब, राम लखन, परिंदा, बेटा हे माधुरी दिक्षित बरोबरचे त्यांचे चित्रपट विशेष गाजले.
-
९० च्या दशकात अनिल कपूर सर्वात यशस्वी नायक होते. मशाल, युद्ध, मेरी जंग, कर्मा, चमेली की शादी, मिस्टर इंडिया, राम लखन आणि लाडला हे त्यांचे चित्रपट विशेष गाजले.

नकाशावरून पुसून टाकण्याच्या धमकीला पाकिस्तानचं उत्तर; म्हणाले, “भारतात घुसून…”