-
बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमारने अभिनयाच्या जोरावर स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. आज सर्वाधिक कमाई करणाऱ्या कलाकरांच्या यादीमध्ये अक्षयचे नाव आहे. चला जाणून घेऊया अक्षय कुमारच्या काही महागड्या वस्तू…
-
बॉलिवूडमधील काही निवडक कलाकारांकडे स्वत:चे प्रायवेड जेट आहे.
-
या निवडक कलाकारांच्या यादीमध्ये अक्षय कुमारचे नाव देखील आहे. अक्षयच्या जेटची किंमत जवळपास २६० कोटी रुपये असल्याचे म्हटले जाते.
-
अक्षयच्या महागड्या गोष्टींमध्ये त्याच्या बंगल्याचा देखील समावेश आहे.
-
अक्षयचा मुंबईमधील जुहू येथे बंगला आहे. या बंगल्याची किंमत जवळपास ८० कोटी रुपये असल्याच्या चर्चा सुरु आहेत.
-
अनेकदा अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना सोशल मीडियावर बंगल्याच्या आतील फोटो शेअर करताना दिसतात.
-
अक्षय कुमारचे कार कलेक्शन देखील मोठे आहे. या मध्ये अनेक महागड्या गाड्यांचा समावेश आहे.
-
त्यामध्ये ३.२ कोटींची Bently Flying Spur ही गाडी देखील आहे. ही गाडी भारतातील काही ठराविक लोकांकडे आहे.
-
तसेत अक्षयकडे Rolls Royce Phantam ही कार देखील आहे. या कारची किंमत ३.३४ कोटी असल्याचे म्हटले जाते.
-
अक्षयकडे एक बाईकही आहे.
-
अभिनेता जॉन अब्राहमने अक्षयला Harley Davidson V-Rod ही बाईक गिफ्ट दिली होती. या बाईकची किंमत २० लाख रुपये असल्याचे म्हटले जाते.

मोठी बातमी : पुण्यात आमदार बापूसाहेब पठारे यांना मारहाण