-
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर अनेक कलाकारांवर नेटकऱ्यांनी निशाणा साधला. तसेच करण जोहर, सलमान खान, एकता कपूर, संजय लीला भन्साली आणि इतर काही कलाकारांच्या विरोधात बिहारमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. तसेच सोशल मीडियावर सुरु असलेल्या वादापासून लांब जाण्यासाठी काही कलाकारांनी सोशल मीडियाला रामराम ठोकला. चला पाहूया या यादीमध्ये कोणते कलाकार आहेत.
-
लोकप्रिय गायिका नेहा कक्करने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत सोशल मीडियाला रामराम ठोकला.
-
नेहा कक्कर आधी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने सोशल मीडियापासून लांब जात असल्याचे सांगत ट्विटर अकाऊंट डिलिट केले.
-
अभिनेता साकिब सलीमने देखील सोशल मीडियाला रामराम ठोकला आहे.
-
सलमानची बहिण अर्पिता खानचा पती आयुष शर्माने ट्विट अकाऊंट डिअॅक्टिवेट केले आहे.
-
बॉलिवड अभिनेता जहीर इकबालने देखील सुशांतच्या आत्महत्येनंतर सोशल मीडिया अकाऊंट डिअॅक्टिवेट केले आहे.

भर बसस्थानकात तरुणाचं घाणेरडं कृत्य! महिलांसमोर जाऊन बसला अन्…, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “अशांना चोपलंच पाहिजे”