-
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर त्याची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती चर्चेत आली आहे.
सुशांतसोबत रिलेशनशिपमध्ये असलेली ही रिया आहे तरी कोण आणि तिचं दिग्दर्शक महेश भट्ट यांच्यासोबत का नाव जोडलं जातंय, असे अनेक प्रश्न सध्या नेटकऱ्यांना पडले आहेत. रियाने महेश भट्ट यांच्या 'जलेबी' या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वेळी महेश भट्ट व रियाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. या फोटोंमुळे महेश भट्ट व रियाला खूप ट्रोल केलं गेलं होतं. तुम्ही एकमेकांना डेट करत आहात का असाही प्रश्न नेटीझन्सनी त्यांना विचारला होता. त्यावेळी टिकाकारांना न जुमानता महेश भट्ट यांच्यासोबतचा आणखी फोटो शेअर करत रियाने ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं होतं. 'काविळ झालेल्याला जग पिवळंच दिसतं, तुम्ही जसे आहात तसंच तुम्हाला जग दिसतं,' अशा शब्दांत रियाने ट्रोलर्सना फटकारलं होतं. ‘इथे सीतेलासुद्धा बदनाम करण्यात आलं. ट्रोल करणाऱ्यांनो तुम्हाला हे माहित आहे का, की तुम्ही जसे आहात तसंच तुम्हाला जग दिसतं,’ असं आणखी एक ट्विट करत तिने महेश भट्ट यांच्यासोबतचा फोटो शेअर केला होता. नेटकऱ्यांनी रिया आणि महेश भट्ट यांची तुलना अनुप जलोटा आणि जसलीन माथुराशी केली होती. ‘बिग बॉस १२’मुळे अनुप- जसलीन ही जोडी खूप चर्चेत होती. दोघांच्या वयातील ३७ वर्षांच्या अंतरामुळे ही जोडी चर्चेत होती. -
'जलेबी' या चित्रपटानंतर रिया व महेश भट्ट यांच्यात चांगली मैत्री झाली होती.
-
रिया तिच्या आयुष्यातील महत्त्वाच्या निर्णयांबाबत महेश भट्ट यांचे सल्ले घ्यायची असं म्हटलं जातं.
-
सुशांत नैराश्यात आहे हे जेव्हा महेश भट्ट यांना समजलं होतं, तेव्हा तू त्याच्यासोबत आणखी काळ राहू नकोस, असा सल्ला महेश भट्ट यांनी रियाला दिल्याचं म्हटलं जातं.
-
सुशांतच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी रियाचाही जबाब नोंदवून घेतला.
-
तब्बल ११ तास रियाची चौकशी झाली होती.

नकाशावरून पुसून टाकण्याच्या धमकीला पाकिस्तानचं उत्तर; म्हणाले, “भारतात घुसून…”