मालविका मोहनन – रजनीकांत यांच्या 'पेट्टा' या चित्रपटात झळकलेली अभिनेत्री मालविका मोहनन दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत फार प्रसिद्ध आहे. मालविका प्रत्येक चित्रपटासाठी ५ कोटी रुपये इतकं मानधन घेत असल्याचं म्हटलं जातं. (छायाचित्र सौजन्य : इन्स्टाग्राम) नयनतारा- सर्वाधिक मानधन घेणाऱ्या दाक्षिणात्य अभिनेत्रींच्या यादीत नयनतारा अग्रस्थानी होती. मात्र मालविकाने तिला मागे टाकलं आहे. नयनतारा एका चित्रपटासाठी ४ कोटी रुपये मानधन घेते. (छायाचित्र सौजन्य : इन्स्टाग्राम) अनुष्का शेट्टी- 'बाहुबली' फेम अनुष्का शेट्टी एका चित्रपटासाठी चार ते पाच कोटी रुपये मानधन घेते. (छायाचित्र सौजन्य : इन्स्टाग्राम) काजल अग्रवाल- 'सिंघम' चित्रपटात झळकलेली अभिनेत्री काजल अग्रवाल दाक्षिणात्य इंडस्ट्रीत लोकप्रिय आहे. ती एका चित्रपटासाठी तीन कोटी रुपये मानधन घेते. (छायाचित्र सौजन्य : इन्स्टाग्राम) श्रुती हासन- कमल हासन यांची मुलगी श्रुती हासन एका दाक्षिणात्य चित्रपटासाठी अडीच कोटी रुपये मानधन घेते. (छायाचित्र सौजन्य : इन्स्टाग्राम) समंथा अक्किनेनी- नागार्जुन यांची सून व नागचैतन्यची पत्नी समंथा अक्किनेनी एका चित्रपटासाठी दोन कोटी रुपये मानधन घेते. (छायाचित्र सौजन्य : इन्स्टाग्राम) तापसी पन्नू- बॉलिवूडमध्ये दमदार अभिनयासाठी ओळखली जाणारी तापसी दाक्षिणात्य इंडस्ट्रीतही प्रसिद्ध आहे. तापसी दाक्षिणात्य चित्रपटासाठी दीड ते दोन कोटी रुपये मानधन घेते. (छायाचित्र सौजन्य : इन्स्टाग्राम) तमन्ना भाटिया- तमन्ना एका चित्रपटासाठी दीड ते दोन कोटी रुपये मानधन घेते. (छायाचित्र सौजन्य : इन्स्टाग्राम) रकुल प्रीत सिंग- टॉलिवूडसोबतच बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध असलेली रकुल प्रीत सिंग एक ते दोन कोटी रुपये मानधन घेते. (छायाचित्र सौजन्य : इन्स्टाग्राम)

Pakistan On US : पाकिस्तानची नवी खेळी, थेट अमेरिकेला दिली ‘ही’ मोठी ऑफर; भारतावर काय परिणाम होणार?