-
धनबादचं नाव कानावर पडलं तरी अनेकांना गँग्ज ऑफ वासेपूरची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. कोळशाचा खाणींवर वर्चस्व प्रस्थापित करण्याचा संघर्ष, त्यात येणार राजकारण अन् गुंडगिरीतून घडणारा रक्तपात. तीन पिढ्यापर्यंत चाललेल्या रक्तरंजित संघर्षाची गोष्ट म्हणजे गँग्ज ऑफ वासेपूर. दोन भागात आलेल्या या सिनेमाची व त्यातील कलाकारांची आठवण येण्याचं कारण म्हणजे या सिनेमाला प्रदर्शित होऊन आठ वर्ष पूर्ण झाली आहेत. या चित्रपटाची दखल 'द गार्डियननंही घेतली होती. २१ व्या शतकातील जगभरातील उत्कृष्ट १०० सिनेमांच्या यादीत स्थान मिळवणारा गँग्ज ऑफ वासेपूर हा एकमेव भारतीय सिनेमा ठरला. सिनेमाची कथा जशी प्रेक्षकांच्या मनात रूतून बसणारी आहे, तशीच दुसरी गोष्ट म्हणजे सिनेमातील कलाकार व त्यांचा अभिनय. मनोज वाजपेयी, तिग्मांशू धुलियापासून ते राजकुमार राव पर्यंत प्रत्येकाने साकारलेल्या भूमिका गँग्ज ऑफ वासेपूरचा विषया निघाल्यावर नजरेसमोर येतात. यातील कलाकारांनी आपल्या अभिनयाने जसे चार चांद लावले. त्याचप्रमाणे या सिनेमाने त्यांच्यातील अस्सल कलाकाराची दखल घ्यायला भाग पाडलं. यातील बहुतांश कलाकारांनी आता बॉलिवूडमध्ये आपली स्वतःची छाप उमटवली आहे. (फोटो सौजन्य :इंडियन एक्स्प्रेस/जनसत्ता)
-
सिनेमातील महत्त्वाचं आणि सुरूवातीपासून शेवटपर्यंत नजरेसमोर राहणार पात्र म्हणजे रामधीर सिंह. ही भूमिका साकारली आहे. तिग्मांशू धुलिया यानं. वासेपूर दबंग माफिया डॉन अशी ही व्यक्तीरेखा तिग्मांशूनं लिलया पेलली आहे. त्यामुळे त्याची भूमिका प्रेक्षकांच्या कायमची लक्षात आहे.
-
सरदार खान! गँग्ज ऑफ वासेपूरमधील महत्त्वाच पात्र. वडिलांची हत्या करणाऱ्या रामधीर सिंहचा बदला घ्यायचा या सूडानं पेटलेल्या सरदार खानची भूमिका केली अभिनेता मनोज वायपेयी यानं. मनोज वाजपेयीनं आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक भूमिका साकारल्या. त्यात ही प्रेक्षकांची दाद मिळवून देणारी ठरली.
-
शाहिद खान… कोळसा खाणीवर मजूर असलेल्या शाहिद खानच्या भूमिकेत जयदीप अहलवात आहे. छोट्याशा भूमिकेतूनही जयदीप अहलवात यांनी स्वतःमधील कलाकार दाखवून दिला. अलिकडेच त्यांची मुख्य भूमिका असलेली पाताल लोक वेबसीरिजही प्रचंड गाजली.
-
बॉलिवूडमध्ये पियूष मिश्रा हे नाव आता नवं राहिलेलं नाही. कवि, गीतकार याबरोबरच कसदार अभिनेता असलेल्या पियूष मिश्रानं नासीर अहमद ही भूमिका साकारलेली आहे. या सिनेमापूर्वी व नंतरही अनेक भूमिका पियूष मिश्रा यांनी केल्या. मात्र, गँग्ज ऑफ वासेपूरमधील त्यांची भूमिका न विसरता येणारी आहे.
-
नागा खातून… कब खोलेगा गा रे तेरा खून हा डॉयलॉग अनेकदा मीम्समधून आपल्याला बघायला मिळतो. हा संवाद आहे, गँग्ज ऑफ वासेपूरमधील. फैजल व नागा खातून (सरदार खानची पत्नी) यांच्यातील. नागा खातूनची भूमिका केली आहे रिचा चढ्ढा हिने.
-
गँग्ज ऑफ वासेपूरमधील सर्वात जास्त काळ मनात राहणार पात्र म्हणजे फैजल खान. नेहमी नशेत राहणाऱ्या फैजल खानची भूमिकेत आहे नवाजुद्दीन सिद्दीकी. अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये पाय रोवणाऱ्या नवाजुद्दीननं ही भूमिका कशी साकारली आहे. हे वेगळं सांगण्याची गरज नाही.
-
हुमा करेशीनं या सिनेमात मोहसीनाची भूमिका केली आहे. फैजल आणि मोहसीना यांच्यातील अनेक प्रसंग खळखळून हसायला लावणारे आहेत. या सिनेमाला आठ पूर्ण झाल्या निमित्तानं हुमानं काही दिवसांपूर्वीच यातील एका प्रसंगाला ट्विट करून उजाळा दिला.
-
पंकज त्रिपाठी… 'यहाँ कबूतर भी एक पंख से उडता है, दुसरे पंख से अपनी इज्जत बचाता है,' हा डायलॉग कानावर पडला की नजरेसमोर येतो. बनियान व लुंगीवर असलेला सुलतान कुरेशी. या रक्तरंजित संघर्षातील सुलतान हे महत्त्वाच पात्र. ते साकारलं आहे. पंकज त्रिपाठीनं. त्यानंतर अशा अनेक भूमिकेत तो बघायला मिळाला.
-
शमशाद आलम… पैशांच्या हव्यासापोटी फैजल खानलाही गंडवणार माणूस. ही व्यक्तिरेखा साकारली आहे राजकुमार राव यानं. या सिनेमातील त्याचा अभिनयही वाखाणण्यासारखा आहे.
-
डेफेनिट खान… काहे की हमार लक्ष्य डेफेनिट हो चुका है, सरदार खान की मौत. गँग्ज ऑफ वासेपूरची कथा ज्यानं लिहिली त्या झिशान कादरीनं ही भूमिका साकारली आहे. झिशान जेव्हा सिनेमाचा दिग्ददर्शक अनुराग कश्यपकडे ही कथा घेऊन गेला होता. तेव्हा ही भूमिका स्वतः करणार असल्याची अट त्यानं टाकली होती, असा किस्सा आहे.

Kitchen jugad video: फ्रिजमध्ये कापूस ठेवताच कमाल झाली; पहिल्याच महिन्यात अर्ध्यापेक्षा कमी येईल वीज बिल