-
मलायका अरोरा बॉलिवूडची डिवा म्हणून ओळखली जाते. अनेकदा ती तिच्या वैयक्तीक आयुष्यामुळेही चर्चेत आली आहे. (सर्व फोटो – मलायका अरोरा, इन्स्टाग्राम)
-
मलायका ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ती कायम चर्चेत असते.
-
अनेकदा ती आपल्या नव्या घराचेही फोटो शेअर करताना दिसते. तिचे इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोअर्सदेखील आहेत.
-
अनेकदा ती आपल्या घराच्या आतील फोटो शेअर करत असते. त्यावरून कल्पना येईलच की तिचं घरंही किती luxurious आहे.
-
आठ आसनी डायनिंग टेबलपासून बेडरूममधील सर्व महागड्या वस्तूंपर्यंत सर्वाचीच तिनं चांगली सजावट केली आहे.
-
अरबाझ खानपासून विभक्त झाल्यानंतर २०१६ मध्ये ती आपल्या या नव्या घरी राहायला आली होती.
-
मलायका ही तिचा मुलगा अरहान आणि त्यांचा पाळीव कुत्रा कॅस्पर याच्यासह त्या घरात राहते.
-
स्टायलिश आणि स्टनिंग सेलिब्रिटींपैकी एक म्हणून मलायका ओळखली जाते. तिची हीच ओळख तिच्या घरातूनही दिसून येते.
-
कमीतकमी इंटिरिअर आणि डोळ्यात भरणारी सजावट आपल्या अगदी मन मोहून टाकते.
-
काही दिवसांपूर्वी ती इन्स्टाग्रामवरील आपल्या एका व्हिडीओमुळेही चर्चेत आली होती.
-
त्या व्हिडीओमध्ये तिनं पाणी पिण्याची योग्य पद्धत कशी असते याचं प्रात्यक्षिक दाखवलं होतं. तिचा तो व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअरही झाला होता.
-
तर त्यानंतर सरकारनं ५९ चिनी अॅप बंद केल्यानंतर पुन्हा एकदा ती चर्चेत आली होती.तर त्यानंतर सरकारनं ५९ चिनी अॅप बंद केल्यानंतर पुन्हा एकदा ती चर्चेत आली होती.
-
टिकटॉकच्या व्हिडीओपासून सुटका झाल्याबद्दल तिनं आनंद व्यक्त केला होता. तसंच तिनं याबद्दल सरकारचे आभारही मानले होते.
-
लॉकडाउनच्या कालावधीतही ती सोशल मीडियावर सक्रिय होती.
-
य़ादरम्यानही तिनं अनेक व्हिडीओ आणि फोटो शेअर केले होते.
-
तसंच तिनं घरबसल्या योगा कसा करावा याचं प्रात्यक्षिकही दाखवलं होतं. यासंदर्भात तिनं काही व्हिडीओदेखील शेअर केले होते.
-
मध्यंतरी जिमला जाताना तिनं घातलेल्या कपड्यांवरुनही ती चर्चेत आली होती.

Kitchen jugad video: फ्रिजमध्ये कापूस ठेवताच कमाल झाली; पहिल्याच महिन्यात अर्ध्यापेक्षा कमी येईल वीज बिल