-
अभिनेता अजय देवगणने या आठवडयाच्या सुरुवातीला त्याच्या आगामी ‘भूज द प्राइड ऑफ इंडिया’ या चित्रपटाचा नवीन पोस्टर रिलीज केला. (फोटो सौजन्य – अजय देवगण इन्स्टाग्राम)
-
करोना व्हायरसच्या सध्याच्या परिस्थितीमुळे हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज न होता डिझनी हॉटस्टावर या डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
-
अजय देवगण बरोबर संजय दत्त आणि सोनाक्षी सिन्हा यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.
-
१९७१ सालच्या भारत-पाकिस्तान युद्धावर हा चित्रपट आधारीत आहे. एका सत्य कथेवर हा चित्रपट आधारीत आहे. एकदिवस आणि एकारात्रीची ही कथा आहे. हा चित्रपट सैन्यदलाच्या मदतीसाठी एकरात्रीत रस्ता बांधणाऱ्या सर्वसामान्यांची कथा सांगतो. अशा शौर्यावर आणखी चित्रपट बनवले जाणे आवश्यक आहे असे अजय देवगणे व्हर्च्युल पत्रकार परिषदेत सांगितले.
-
अजय देवगणने या चित्रपटात इंडियन एअर फोर्सच्या पायलटची भूमिका साकारली आहे.
-
या चित्रपटामध्ये अजय स्क्वाड्रन लीडर विजय कार्णिक यांची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट यावर्षी १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार होता. पण देशभरात सिनेमागृह बंद असल्यामुळे आता डिजिटल प्लॅटफॉर्मवर चित्रपट रिलीज करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
-
‘भूज द प्राइड ऑफ इंडिया’मध्ये गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील माधापार गावातील ३०० महिलांची कथा दाखवण्यात आली आहे. भारताला युद्धात विजय मिळवून देण्यासाठी या महिलांनी दिलेले योगदान कथेतून मांडण्यात आले आहे.
-
भूजमधली एकमेव धावपट्टी पुन्हा बांधण्यासाठी या सर्व महिला एकत्र येतात. युद्ध जिंकण्यासाठी इथून भारतीय फायटर विमानांचे उड्डाण होणे आवश्यक असते.
-
"सेटवर अजय सर खूप शिस्त पाळतात. त्यांचा अभिनय खूप नैसर्गिक आहे. दिग्दर्शकने अॅक्शन म्हटल्यानंतर ते लगेच त्या भूमिकेत शिरतात".
-
"त्यांच्याकडून शिकण्यासारखे बरेच काही आहे. मी भाग्यवान आहे, कारण मला माझ्या पहिल्या बॉलिवूड चित्रपटात त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली" असे दाक्षिणात्य अभिनेत्री प्रणिता सुभाषने सांगितले.

Kitchen jugad video: फ्रिजमध्ये कापूस ठेवताच कमाल झाली; पहिल्याच महिन्यात अर्ध्यापेक्षा कमी येईल वीज बिल