-
आज, सहा जुलै रोजी बॉलिवूडमधील सर्वांचा लाडका अभिनेता रणवीर सिंगचा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त पाहूयात रणवीर आणि दीपिका यांचे रोमँटीक फोटो..
-
रणवीरचं दीपिकावर किती प्रेम आहे हे साऱ्यांनाच ठावूक आहे.
-
रणवीरचं केवळ दीपिकावर प्रेमच नाहीये तर तो तिची काळजीही तितकीच घेतो.

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी १५ नोव्हेंबर रोजी सिंधी पद्धतीने लग्नगाठ बांधली. -
चाहत्यांमध्ये लोकप्रिय असलेली ही जोडी सतत या ना त्या कारणामुळे चर्चेत असते.

दरम्यान, लवकरच रणवीरची मुख्य भूमिका असलेला ’83’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये तो तत्कालीन कर्णधार कपिल देव यांची भूमिका साकारत आहे. विशेष म्हणजे त्याच्यासोबत दीपिकादेखील स्क्रीन शेअर करणार आहे. -
-
बॉलिवूडचे 'बाजीराव-मस्तानी' अर्थात दीपिका पदुकोण- रणवीर सिंग सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात.
-
लग्नापूर्वी या दोघांमध्ये चांगली मैत्री होती, त्यामुळे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि बराच काळ त्यांनी एकमेकांना डेटही केलं.
-
सर्व फोटो रणवीर सिंहच्या इन्स्टाग्राम पेजहून घेतले आहेत.
“AI मुळे जितक्या नोकऱ्या जातील त्यापेक्षा भयंकर…”, आनंद महिंद्रा यांची कर्मचारी तुटवड्यावरील टिप्पणी चर्चेत